मुंबई, 24 डिसेंबर : Radhe Shyam Trailer Out: सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि बॉलीवूड अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) यांच्या आगामी 'राधे श्याम' (Radhe Shyam)’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलरही आज (23 डिसेंबर) प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलर (Prabhas and Pooja Hegde film Radhe Shyam) रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
ट्रेलरमध्ये प्रभास आणि पूजाची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. ख्रिसमसच्या आधी प्रभासच्या चाहत्यांसाठी ही एखाद्या मोठ्या गिफ्टपेक्षा कमी नाही. हा चित्रपट एका रोमँटिक प्रेमकथेवर आधारित आहे. राधे श्याम ट्रेलरमध्ये (Radhe Shyam Trailer) याची झलक ट्रेस्पष्टपणे दिसत आहे. ट्रेलरमध्ये एकीकडे प्रभास खूपच डॅशिंग दिसत आहे, तर दुसरीकडे पूजाही सौंदर्यात सर्वांना मात देताना दिसत आहे.
वाचा-यशपाल शर्मांच्या आठवणीत कपिल देव भावुक, रणवीर सिंहलाही अश्रू अनावर
चित्रपटाच्या ट्रेलरने वाढवली आहे उत्कंठा
चित्रपटाचा ट्रेलरने (Radhe Shyam Trailer Release) प्रेक्षकांमध्ये चित्रपटगृहात पाहण्यासाठी उत्सुकता वाढली आहे. 'राधे श्याम'मध्ये पूजा आणि प्रभास पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र रोमान्स करताना दिसणार आहेत. याआधी या चित्रपटाचा टीझरही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. इतकेच नाही तर या चित्रपटाचा टीझर ट्विटरवर टॉप ट्रेंड करू लागला होता.
या दिवशी हा चित्रपट होणार आहे चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित
'राधेश्याम' ही युरोपमधील एक महाकाव्य प्रेमकथा असल्याचे मानले जाते. 'पॅन इंडिया' या चित्रपटात प्रभास आणि पूजा हेगडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात सचिन खेडेकर, भाग्यश्री, प्रियदर्शी, मुरली शर्मा, साशा छेत्री, कुणाल रॉय कपूर यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 14 जानेवारी 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.