• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • एका तिकिटात संपूर्ण कुटुंबं Eid ला पाहणार Radhe; फार नफा नसला तरी भाईजान सलमानला मोठा फायदा

एका तिकिटात संपूर्ण कुटुंबं Eid ला पाहणार Radhe; फार नफा नसला तरी भाईजान सलमानला मोठा फायदा

सलमान खानच्या कमिटमेंटनुसार राधे (Radhe) ईदच्या (Eid 2021) मुहूर्तावर प्रदर्शित होतो आहे.

  • Share this:
मुंबई, 12 मे : बॉलिवूडचा (Bollywood) दबंग खान म्हणून प्रसिद्ध असणारा भाईजान अर्थात सलमान खानचा (Salman Khan) वाँटेड चित्रपटातील एक डायलॉग प्रसिद्ध आहे. तो म्हणजे ‘एक बार जो मैने कमिटमेंट कर दी तो मै खुद की भी नही सुनता’. सलमान खान आपल्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीही नेहमी हा डायलॉग वापरतो आता तर ती त्याची ओळख झाली आहे. त्याच्या राधे (Radhe-Your Most Wanted Bhai) चित्रपटाच्या बाबतीत त्यानं हे सिद्ध केलं आहे. सलमान खान दरवर्षी ईदच्या (Eid 2021) मुहूर्तावर आपला एक नवा चित्रपट प्रदर्शित करतो. त्यानुसार यंदा त्याचा राधे हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. याच्या प्रसिद्धीसाठीही सलमानने आपल्या ट्विटर अकाउंटवर याच डायलॉगचा वापर केला आहे. ‘ईद का कमिटमेंट था, ईद परही आयेंगे क्युंकी एक बार जो मैने....’ अशी कॅप्शन देत त्यानं राधेचे पोस्टर शेअर केले आहे. गेल्या वर्षी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे (Corona Virus Pandemic) टाळेबंदी लागू करण्यात आली होती त्यामुळे चित्रपटगृह (Theaters) बंद होती. परिणामी राधे या चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं होतं. यंदाही कोरोनाचं संकट टळलेलं नाही, मात्र ईदच्या दिवशी हा चित्रपट ओटीटी (OTT) आणि सॅटेलाईट टीव्हीच्या (Satellite TV) माध्यमातून प्रदर्शित करण्यात येत आहे. त्यामुळं प्रेक्षकांना घरबसल्या अगदी कमी खर्चात हा चित्रपट बघण्याची संधी उपलब्ध झाली आहे. हे वाचा - रामगोपाल वर्मांचा Dangerous: पहिल्या 'समलैंगिक' थ्रिलर चित्रपटाचा trailer प्रेक्षकांना केवळ 250 रुपये भरून ओटीटी आणि सॅटेलाईट टीव्हीच्या माध्यमातून घरीच हा चित्रपट पाहता येणार आहे. एका तिकिटाच्या किमतीत सगळ्या कुटुंबाला या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे. अर्थात यामुळे चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होणार आहे. पण सलमान खाननं हा धोका पत्करला आहे. कारण त्याचे आगामी चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज होत आहेत. राधेचे प्रदर्शन आणखी लांबलं असतं तर नंतर येणाऱ्या या चित्रपटांच्या प्रदर्शनावरही परिणाम झाला असता. सलमान खानच्या टायगर -3 चं शूटिंग सुरू झालं असून, कभी ईद कभी दिवाली आणि किक-2 हे दोन चित्रपटही येणार आहेत. सूरज बडजात्याच्या एका चित्रपटातही तो काम करणार आहे. हे वाचा - Radheचं प्रमोशन करताना रणदीप हुड्डाला वाटतंय अपराधी; सलमानच्या चित्रपटावर नाराज राधेचे प्रदर्शन आणखी पुढं ढकललं असतं तर या आगामी चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखांचाही गोंधळ झाला असता आणि यापेक्षा त्यानं केलेली ईदची कमिटमेंटही सर्वात महत्त्वाची होती. पैसा आणि नाती यांचं या शोबिझमध्ये महत्त्व आहे. पण एखाद्या सुपरस्टारच्या प्रतिमेपेक्षा त्याला अधिक महत्त्व नाही. त्यामुळे सलमान खान ईदच्या मुहूर्तावर ‘राधे- युअर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येत आहे.
First published: