'राधा प्रेम रंगी रंगली'मध्ये अजून एक वळण, राधाचा वाढणार संभ्रम

'राधा प्रेम रंगी रंगली'मध्ये अजून एक वळण, राधाचा वाढणार संभ्रम

कश्यप नांदे आणि प्रेम सारखेच दिसतायत. त्यामुळे राधाही संभ्रमात पडलीय.

  • Share this:

मुंबई, 30 जुलै : कलर्स मराठीवरच्या राधा प्रेम रंगी रंगली या लोकप्रिय मालिकेत आता बऱ्याच उलाढाली होणार आहेत. राधा आणि प्रेम यांचा रोमान्स हा मालिकेचा युएसपी. राधा प्रेमच्या आयुष्यातून निघून गेल्यानंतर तिने अनेक प्रश्न मागे सोडले, घरच्यांसाठी तो एक धक्काच होता. प्रेम त्या धक्क्यामधून कसाबसा सावरत होता की, देवयानी आणि दीपिकाने त्याला त्यांच्या जाळ्यात आणि कारस्थानामध्ये पूर्णत: अडकवले. परंतु जसजसे दिवस सरत गेले गुंता, प्रश्न सगळे सुटत गेले. राधा जिवंत आहे, तिच्या पोटामध्ये प्रेमचे मुलं वाढत आहे, राधा कधीच विपश्यना केंद्रात गेली नसून ती इंदोरमध्ये एका इस्पितळामध्ये परिचारिका म्हणून कार्यरत होती अश्या अनेक गोष्टी समोर आल्या. जसजसा गुंता सुटत गेला प्रेमला राधाविषयीची वाटणारी काळजी वाढत गेली. सगळ्या गोष्टी समोर येत आहेत पण राधा अजूनही भेटली नाही ती कुठे आहे याची माहिती अजूनही मिळाली नाही. परंतु या सगळ्यामागे दीपिका आणि देवयानी आहे हे मात्र प्रेमला कळून चुकलं.

हेही वाचा

बाॅलिवूड सुपरस्टार्सच्या आईनं केली नव्वदी पूर्ण, वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आनंद आहुजाच्या वाढदिवसाला मेव्हणीचं अनोखं गिफ्ट

PHOTOS : मानस-वैदेहीच्या लग्नाचा हा अल्बम पाहिलात का?

पण आता मालिकेत कमालीचं वळण येणार आहे. ते म्हणजे सचित पाटीलचा डबल रोल. कश्यप नांदे आणि प्रेम सारखेच दिसतायत. त्यामुळे राधाही संभ्रमात पडलीय. यावर सचित म्हणाला, 'राधा प्रेम रंगी रंगली मालिकेने आता नवं वळण घेतलं आहे. या मालिकेमध्ये मी आता दुहेरी भुमिकेमध्ये दिसणार आहे. कश्यप नांदेची भूमिका मी साकारणार आहे. मी आयुष्यात पहील्यांदाच डबल रोल साकारत आहे. प्रेम या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता मला डबल रोल करण्याची संधी या मालिकेमुळे मिळत आहे.'

कश्यप हा अतिशय रावडी, मवाली असा माणूस आहे. कश्यप नांदे काही महिन्यामध्ये मरणार आहे, ज्याची त्याला अजिबात काळजी नाहीये. देवयानीमुळे कश्यप राधाच्या आयुष्यात येणार आहे. आता कश्यप नांदे आणि राधा एकत्र येतील, पण पुढे राधाचे काय होईल ? हे बघण्यासारखे असणार आहे. कश्यपचा लुक खूपच वेगळा आहे. लुक वेगळा दिसण्यासाठी कश्यपची वेशभूषा वेगळी आहे आणि वेगळ्या रंगाच्या लेन्स देण्यात आल्या आहेत.

First published: July 30, 2018, 5:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading