• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • बाॅक्स आॅफिसवर पहिल्याच दिवशी 'रेस 3' सर्वात पुढे

बाॅक्स आॅफिसवर पहिल्याच दिवशी 'रेस 3' सर्वात पुढे

सलमानच्या रेस-3 सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवसाच्या कमाईच्या बाबतीत सगळे रेकॉर्ड तोडले.

  • Share this:
मुंबई, 17 जून : दरवर्षी ईदच्या मुहुर्तावर सिनेमा आणून धमाल उडवून टाकणाऱ्या सलमानसाठी हे वर्षही नवीन नाही. त्याचा नवीन सिनेमा रेस 3 ईदच्या मुहुर्तावर रिलीज झाला आणि त्याला चांगलं ओपनिंगही मिळालं. हा सिनेमा ह्या वर्षीचा सर्वात मोठा ओपनर ठरला. रेमो डिसुझाच्या दिग्दर्शनात बनलेल्या ह्या सिनेमाने पहिल्याच दिवशी 29 करोडची कमाई केली. याआधी ह्या वर्षाच्या मोठी ओपनिंग करण्याचा रेकॉर्ड बागी 2 सिनेमाच्या नावावर होता. सिनेमा अॅनालिस्ट तरण आदर्शच्या ट्वीटनुसार, 'रेस3'ने पहिल्याच दिवशी 29.17 करोडची कमाई केली आहे. सिनेमा ईदच्या एक दिवसआधी प्रदर्शित होऊन देखील सिनेमाला खूप फायदा झाला. पहिल्याच आठवड्यात हा सिनेमा 50 करोडपेक्षा जास्त कमाई करेल अशी अपेक्षा आहे. अभिनेता अमीर खानने सुद्धा ट्वीट करून रेस 3 साठी सलमानला शुभेच्छा दिल्या आहेत. रेस-3 हा सलमानच्या ईदच्या मुहुर्तावर रिलीज झालेल्या सिनेमांमध्ये सर्वात जास्त ओपनिंग कलेक्शन करणारा तिसरा सिनेमा ठरला आहे. याआधी सलमानच्या आतापर्यंत सर्वात मोठा ओपनर सिनेमांमध्ये सुलतान (36.54 करोड) आणि एक था टायगर (36.54 करोड) यांचा समावेश आहे. ह्या सिनेमाचे डायलॉग आणि अॅक्शन सिक्वेन्सची सोशल मीडियावर खूप खिल्लीही उडवली जात आहे, तरीदेखील भाईजानच्या फॅन्समध्ये खूप उत्साह आहे.
First published: