'रेस 3'मध्ये सलमानसोबत कोण कोण आहेत कलाकार?

आता लवकरच 'रेस-3' आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. यात सलमान खान मुख्य भूमिकेत झळकणार असल्याची घोषणा केली आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Nov 3, 2017 05:06 PM IST

'रेस 3'मध्ये सलमानसोबत कोण कोण आहेत कलाकार?

03 नोव्हेंबर : आता लवकरच 'रेस-3' आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. यात सलमान खान मुख्य भूमिकेत झळकणार असल्याची घोषणा केली आहे. हे जाहीर झाल्यापासून त्याच्या चाहत्यांमधला उत्साह चांगलाच वाढला आहे. या सिनेमासाठी इतर कलाकारांची नावंही घोषित करण्यात आली आहे. सलमान खानसोबत  जॅकलीन फर्नांडिसचा जलवा आपल्याला पहायला मिळणार आहे. यात अजून अनेक मोठे कलाकार असणार आहेत.

रेस सिनेमाच्या तिसऱ्या पार्टमध्ये बॉबी देओल आणि डेजी शहाही झळकणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन रेमो डिसुझा करणार असून सुप्रसिद्ध निर्माता रमेश तोरानी यांची निर्मिती आहे.  2018च्या ईदपर्यंत हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.

'हवा हवाई' या सिनेमातील साकिब सलीमही रेस-3 मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहे. साकिब या सिनेमात नकारात्मक भूमिका साकारणार आहे.

रेस सिनेमांच्या मालिकेतील पहिला रेस सिनेमा 2008 मध्ये प्रदर्शित झाला. रहस्य आणि थरार यांनी भरलेला सिनेमा बॉक्स ऑफिसवर खूप हिट झाला होता.

या सिनेमात सैफ अली खान, अक्षय खन्ना आणि बिपाशा बासू मुख्य भूमिकेत होते.

Loading...

यानंतरचा रेस-2 2013 मध्ये बॉक्स ऑफिसवर आला पण पहिल्या रेस सिनेमासारखी पसंती रेस-2 ला मिळाली नाही. आता रेस-3 ला लोक किती प्रतिसाद हे बघणं उत्सुकतेचं आहे. या सिनेमाची स्टार कास्ट जबरदस्त असल्याने आता चाहत्यांची अपेक्षाही वाढली आहे. आता हा सलमानचा सिनेमा त्याच्या चाहत्यांवर किती जादू करणार ते पुढच्या वर्षीच्या ईदलाच कळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2017 05:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...