Home /News /entertainment /

स्वत:चा शोध घेणारं 'रब राखा' गाणं, द यलो डायरीने केलं रिलिज

स्वत:चा शोध घेणारं 'रब राखा' गाणं, द यलो डायरीने केलं रिलिज

भारतीय पॉप बँड द यलो डायरीने नुकताच 'रब राखा' या गाण्याचा टीझर रिलीज केला आहे.

    मुंबई, 28 जानेवारी : भारतीय पॉप बँड द यलो डायरीने नुकताच 'रब राखा'  या गाण्याचा टीझर रिलीज केला आहे. सोनी म्युझिक इंडियासोबत हा ट्रॅक रिलिज करण्यात आला असून स्वत:च्या शोधात असलेल्यांना विश्वास या गाण्यातून मिळतो. याआधी रिलिज करण्यात आलेल्या गाण्यांप्रमाणेच यात सुमधूर सूर आणि ताल यांचा अनोखा मिलाफ ऐकायला मिळतो द यलो डायरी त्यांच्या कवितांसाठी ओळखलो जाते. पदार्पणातच 'मर्झ' सर्वांच्या पसंतीस उतरले होते. त्यानंतर 2018 मध्ये इझाफा ने तरुणांच्या आणि विशेषत: कॉलेजियन्सना भूरळ घातली होती. भारताच्या पॉप संगीताच्या क्षेत्रात काव्यात्मक शैली आणि संगीताची व्याख्या नव्याने रचली. भारतातील दिग्गज कलाकारांसह याचे चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत. यामध्ये आर माधवन, विशाल दादलानी, शिल्पा राव आणि अमाल मलिक यांचा समावेश आहे. नव्या ट्रॅकच्या लाँचिंगवेळी द यलो डायरीच्यावतीने सांगण्यात आलं की, आमच्यातील प्रत्येकाने स्वता:च्या शोधाचा प्रवास केल्यानंतर तुमच्यासाठी हे संगीत तयार झालं आहे. रब राखा हे खरंच स्पेशल आहे. आम्हाला आशा आहे की प्रेक्षक आमची कथा पाहतील आणि गाण्याशी त्यांच्या पद्धतीने त्यांना हवे तसे जोडले जातील. रब राखा सर्व प्रकारच्या स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. सध्याची तरुणाई ज्या ज्या प्लॅटफॉर्मचा वापर करते तिथं रब राखा मिळेल. द यलो डायरी या प्लॅटफॉर्मवर असलेल्या चाहत्यांचे स्वागत करते. त्यांच्या या कलाकृतीला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद आणि प्रतिक्रिया हीच कामाची पोचपावती असेल. हिमांशू पारिख यांचं म्यूझीक प्रोडक्शन असून राजन बत्रा यांनी गीत लेखन केलं आहे. याच्या वाद्यवृंदामध्ये वैभव पानी, साहिल शाह, स्टुअर्ट डाकोस्टा यांचा समावेश आहे. हे वेगवेगळं वाद्य वाजवत असले, काम करत असले तरी यांच्यात संगीत हे पॅशन आहे. अर्थपूर्ण गाणी, धुंद करणारं संगीत आणि प्रोडक्शनसह भारतातील प्रमुख पॉप बँड होण्याकडं द यलो डायरीची वाटचाल सुरू आहे.
    Published by:Suraj Yadav
    First published:

    पुढील बातम्या