Home /News /entertainment /

'शेवटी तूपण तोच मार्ग स्वीकारलास' प्राजक्ता माळीचा 'रानबाजा' मधील बोल्ड अवतार पाहून नेटकरी भडकले

'शेवटी तूपण तोच मार्ग स्वीकारलास' प्राजक्ता माळीचा 'रानबाजा' मधील बोल्ड अवतार पाहून नेटकरी भडकले

अभिनेत्री तेजस्विनी पंडित ( Tejaswini Pandit ) आणि अभिनेत्री प्राजक्ता माळीची (Prajakta mali ) लवकरच एक बोल्ड सिरीज प्लॅनेट मराठीवर येते आहे. हा बोल्ड अंदाज नेटकऱ्यांना मात्र रूचलेला नाही. अनेकांनी प्राजक्ताला ट्रोल (Prajakta mali Troll ) केलं आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 16 मे-    अभिनेत्री तेजस्विनी पंडित ( Tejaswini Pandit ) आणि अभिनेत्री प्राजक्ता माळीची (Prajakta mali ) लवकरच एक बोल्ड सिरीज प्लॅनेट मराठीवर येते आहे. तेजस्विनी पंडित आणि अभिनेत्री प्राजक्ता माळीने या सीरिजचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. तेजस्विनीचा आणि प्राजक्ताचा देखील यामध्ये बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. हा टीझर ( RaanBaazaar Teaser ) सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. मराठीत पहिल्यांदाच आशी बोल्ड सिरीज भेटीला येत आहे. हा बोल्ड अंदाज नेटकऱ्यांना मात्र रूचलेला नाही. अनेकांनी तिला यावरून ट्रोल  (Prajakta mali Troll )  केलं आहे. शिवाय काहीनीं तिची कौतुक देखील केलं आहे. शेवटी ट्रोलर्संना कंटाळून प्राजक्ताने टीझरवरचं कमेंट्स सेक्शनचं बंद केलं. रानबाजार सीरिजचा टीझर प्राजक्ताने काल, 15 मे रोजी शेअर केला होता. तिनं हा टीझर शेअर करत म्हटलं होतं की, ‘प्रत्येक कलाकाराला आपल्या कारकिर्दीत विविधांगी भूमिकांमध्ये झळकण्याची, समाजात अस्तित्वात असणारी विविध पात्रं साकारण्याची, सतत काहितरी नवं करण्याची इच्छा असते. मी त्याला अपवाद नाही. लहानपणापासून स्मिता पाटील, रंजना यांना बघत मोठी झाले, (मी त्यांच्याइतकी मोठी नक्कीच नाही.) पण त्यांच्या कारकिर्दीतून प्रेरीत होऊन आणि तुम्हां मायबाप रसिक प्रेक्षकांवर विश्वास ठेवून केलेला हा प्रयत्न.,’. पण प्राजक्ताने हा टीझर शेअर करताच लोकांनी तिला नको त्या भाषेत ट्रोल करणं सुरू केलं. अखेर प्राजक्ताने टीझरवरचं कमेंट्स सेक्शनचं बंद केलं. यानंतर प्राजक्ताने आज एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामुळे ती पुन्हा ट्रोल झाली आहे.
  प्राजक्तानं नुकताच रानबाजरचा एक व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की,वणवा पेट घेतोय'रानबाजार'२४ तासांत १ मिलीयन पेक्षा जास्त व्ह्यूज! धन्यवाद प्रेक्षकहो... तिच्या याच पोस्टवर अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. तर काहीनीं तिला ट्रोल देखील केलं आहे. एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, मॅडम आम्ही तुम्हाला महाराष्ट्राची हास्यजत्रा यातून बघतो.पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला मराठी वेशभूषेत बघतो. आम्हाला या स्वरूपाचे पात्र तुमच्याकडून अपेक्षित न्हवत. तर दुसऱ्यानं म्हटलं आहे की, ही अपेक्षा नव्हती प्राजक्ताकडून.. आणखी एकानं म्हटलं आहे की, शेवटी तूपण तोच मार्ग स्वीकारला 😢😢.. दुसऱ्या एकानं म्हटलं आहे की, लज्जास्पद, घृणा, लाज वाटली पाहिजे असे कृत्य समाजासमोर चित्रित करताना प्राजक्ता....अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी प्राजक्ताच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या