• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • सुपरहिट Tiranga फिल्ममधील जोडी नाना - राज कुमार यांची पडद्यामागील स्टोरी

सुपरहिट Tiranga फिल्ममधील जोडी नाना - राज कुमार यांची पडद्यामागील स्टोरी

तिरंगा (Tiranga) या फिल्मनंतर राज कुमार (Raaj kumar) आणि नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी कधीच कोणत्याच फिल्ममध्ये एकत्र काम केलं नाही.

  • Share this:
मुंबई, 10 एप्रिल : राजकुमार (Rajkumar) आणि नाना पाटेकर(Nana Patekar) ही दोन्ही नावं हिंदी चित्रपटसृष्टीतील (Hindi Film Indusrty) मोठी नावं आहेत. हे दोघं दिग्गज आपल्या अभिनयासाठी, दमदार आवाजासाठी जितके प्रसिद्ध तितकेच आपल्या तर्कटी, फटकळ स्वभावासाठीही प्रसिद्ध होते. दोघांचेही परस्परांशी अजिबात पटायचं नाही. यांची परस्परांबद्दलची मतं माहिती असूनदेखील त्यांना चित्रपटात एकत्र आणण्याचे धाडस केलं ते दिग्दर्शक-निर्माते मेहुलकुमार(Mehul Kumar) यांनी आणि हा चित्रपट होता तिरंगा (Tiranga). 1993 मध्ये आलेला हा चित्रपट नाना आणि राजकुमार या दोघांच्या अभिनयामुळे प्रचंड गाजला. ही फिल्म सुपरहिट ठरली. आजही हा चित्रपट प्रेक्षकांना भुरळ घालतो. पण पडद्यावर नाना आणि राजकुमार यांची जी केमिस्ट्री पाहायला मिळाली अगदी त्याच्या विरुद्ध पडद्यामागे होती. सेटवर एकमेकांशी बोलणं दूर तर चक्क एकमेकांकडे पाठ करून बसायचे. तरी त्यांनी असा सुपरहिट सिनेमा दिला. या दोघांना एकत्र आणणारे दिग्दर्शक, निर्माते मेहूलकुमार यांनी एका मुलाखतीदरम्यान राजकुमार आणि नाना यांच्यासंदर्भातील किस्सा सांगितला होता. तिरंगा चित्रपटातील एका प्रमुख भूमिकेसाठी राजकुमार यांचं नाव नक्की झालं होतं. पण दुसऱ्या भूमिकेसाठी अभिनेत्याचा शोध सुरू होता. त्याच दरम्यान नाना पाटेकर यांचा प्रहार (Prahar) हा चित्रपट आला. तो बॉक्स ऑफीसवर फार चालला नाही. पण नानांच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली. त्यामुळे मेहूलकुमार यांनी दुसऱ्या भूमिकेसाठी नाना पाटेकर यांचं नाव निश्चित केलं. चित्रपटाच्या फायनान्सर्सना त्यांनी जेव्हा या दोन अभिनेत्यांची नावं सांगितली तेव्हा त्यांची प्रतिक्रिया होती, एक पूर्व तर एक पश्चिम आहे. दोघांच्या नादात चित्रपट रखडेल. हे वाचा - Weekend Lockdown घरबसल्या मनोरंजन: प्रीमियर एपिसोडपासून IPL पर्यंत कुठे काय बघाल मेहूलकुमार यांनी फायनान्सर्सच्या इशाऱ्याकडे कानाडोळा करत नाना पाटेकर यांना फोन केला तेव्हा नाना पाटेकर यांनी मी व्यावसायिक चित्रपट करत नाही, असं सांगून साफ उडवून लावलं. त्यावर मेहूलकुमार यांनी त्यांना एकदा स्क्रिप्ट तरी ऐकून घ्या अशी विनंती केली. ती नाना पाटेकर यांनी मान्य केली आणि मेहूलकुमार त्यांच्या घरी स्क्रिप्ट ऐकवायला पोहोचलं. स्क्रिप्ट ऐकल्यावर नाना पाटेकर यांना ते आवडलं. त्यांनी चित्रपटात काम करायला होकार दिला. पण एक अटही ठेवली. राजकुमार यांनी काही हस्तक्षेप केला तर मी त्या क्षणी चित्रपट सोडणार. जे काही नुकसान होईल, त्याला मी जबाबदार असणार नाही, असं नाना पाटेकर यांनी स्पष्ट सांगितलं. नानाचा होकार मिळताच मेहूलकुमार यांनी लगेच राजकुमार यांना फोन करून ही बातमी दिली. नाना पाटेकर यांचं नाव निश्चित झालं आहे, म्हटल्याबरोबर राजकुमार प्रचंड चिडले. त्याला कशाला घेतलं? सेटवर तो शिवीगाळ करतो असं ऐकलं आहे, असं ते म्हणाले. पण तरी ते चित्रपटात काम करण्यासाठी तयार झाले. हे वाचा - इरफानच्या आठवणीनं बॉलिवूड झालं भावुक; ती फिल्म पाहून कलाकारांना कोसळलं रडू अखेर हे दोघे दिग्गज कलाकार सेटवर आमनेसामने उभे राहिले. पण सेटवर ते एकमेकांशी बोलायचेदेखील नाहीत. दोघंही एकमेकांपासून दूर एकमेकांकडे पाठ करून बसत. कधीही दोघांमध्ये मैत्री झाली नाही. शूटिंग सुरू असताना सगळा क्रू दोघांमध्ये काही वादविवाद होणार नाहीत याची दक्षता घेत असे. सगळ्यांना दोघांचे स्वभाव माहित असल्यानं अगदी सतर्कपणे काम सुरू असे. असं असूनही सहा महिन्यात चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झालं. दोघांनाही आपली परस्परांबद्द्द्लच्या मतांचा परिणाम आपल्या कामावर होऊ दिला नाही. दोघांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट सुपरहिट ठरला. आजही हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मैलाचा दगड मानला जातो. या चित्रपटानंतर राजकुमार आणि नाना पाटेकर यांनी अन्य कोणत्याही चित्रपटात एकत्र काम केलं नाही.
First published: