Home /News /entertainment /

छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमध्ये दिसणारा हा अभिनेता, आहे तरी कोण? तुम्ही ओळखलंत का?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमध्ये दिसणारा हा अभिनेता, आहे तरी कोण? तुम्ही ओळखलंत का?

अभिनेता आर माधवन (R Madhavan) यानं इन्स्टाग्रामवर (Instagram) नुकतेच काही फोटो (Photos) शेअर केले आहेत. त्यानं आतापर्यंत मोठ्या पडद्यावर ज्या भूमिका कधीही साकारल्या नाहीत, त्याची झलक त्यांन यामध्ये दाखवली आहे.

  मुंबई, 22 डिसेंबर : 'तनु वेड्स मनु' या चित्रपटातला निरागस मनु आणि 'थ्री इडियट्स' या चित्रपटातला बॅकबॅंचर पण फोटोग्राफीचं पॅशन असलेला फरहान सगळ्यांनाच भावतो. त्यानं आतापर्यंत मोठ्या पडद्यावर साकरलेल्या भूमिका जवळपास अशाच प्रकारच्या आहेत. पण या व्यक्तीरेखाचं एक वेगळं वैशिष्ट्यं आहेच. 'साला खडूस' किंवा 2017 साली प्रदर्शित झालेला तामिळ चित्रपट 'विक्रम वेधा' यांसारख्या चित्रपटातून त्यानं साकरलेल्या भूमिकांनाही एक वेगळं वलय आहे.  वरील सर्व व्यक्तीरेखांना योग्य न्याय देणारा अभिनेता आर माधवन यानं नुकतचं इन्स्टाग्रामवर काही फोटोज शेअर केले आहेत. त्यानं आतापर्यंत मोठ्या पडद्यावर ज्या भूमिका कधीही साकारल्या नाहीत, त्याची झलक त्याने यामध्ये दाखवली आहे. तसंच या भूमिका अजून साकारता आल्या नाहीत, अशी खंतही त्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अभिनेता आर माधवन आपल्या अभिनयाची नवीन मेजवानी घेऊन येत आहे. त्याने इंन्स्टाग्रामवर एकूण आठ फोटो शेअर केली आहे. यामध्ये आपण पाहू शकता, माधवननं छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख परिधान केला आहे. तर दुसर्‍या एका फोटोत त्याने अंगरखा आणि पगडी घातली आहे. तर तिसऱ्या फोटोत त्याचा लुक रशियन कोट घातलेला एक चपळ, शातीर मारेकऱ्याचा आहे. या पोस्टला कॅप्शन देताना माधवन यानेआपल्या फॉलोअर्सना विचारलं, की या फोटोंमध्ये कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडली आणि कोणता फोटो माझा वाटतच नाही?
  View this post on Instagram

  A post shared by R. Madhavan (@actormaddy)

  इन्स्टाग्रामवर अनेक चाहत्यांनी माधवनच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाचं कौतुक केलं आणि तसेच त्याला लवकरच हा लुक पडद्यावर पाहायला मिळावा म्हणून शुभेच्छा देखील दिल्या आहेत. दुसऱ्या एका चाहत्यानं एकदम भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं म्हटलं की "पहिल्या फोटोने तर माझ्या हृदयावर घाव घातला आहे. तू या महान राजांच्या प्रतिमेला नक्कीच न्याय देशील." तर काहींना आर माधवन यानं अलाउद्दीन खिलजीच्या खलनायकाची भूमिका साकारलेली पाहायची आहे. बहुतेक चाहत्यांसाठी त्याचे हे सर्व लुक फारच आवडले. 50 वर्षीय अभिनेता आर माधवन आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी बॉलीवूड आणि तामिळ फिल्म इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहे. सध्या माधवन त्याचा आगामी चित्रपट ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तो एक दिग्दर्शक पदार्पण करेल. हा चित्रपट वैज्ञानिक आणि एरोस्पेस इंजिनिअर एस. नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित बायोपिक आहे. माधवन या चित्रपटात नंबी यांची भूमिका साकारणार आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Instagram

  पुढील बातम्या