Home /News /entertainment /

बॉलिवूडला आणखी एक धक्का, प्रसिद्ध दिग्दर्शकाचे जयपूरमध्ये निधन

बॉलिवूडला आणखी एक धक्का, प्रसिद्ध दिग्दर्शकाचे जयपूरमध्ये निधन

शनिवारी 'प्यार तूने क्या किया' (Pyar Tune Kya Kiya) ,रोड (Road) ,उम्मीद (Ummeed), लव इन नेपाल (Love In Nepal) यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शक रजत मुखर्जी यांचे निधन झाले आहे.

    मुंबई, 19 जुलै : बॉलिवूडने 2020 या वर्षामध्ये अनेक दिग्गज कलाकार गमावले आहेत. दरम्यान अजून एक दु:खद बातमी समोर येत आहे. 18 जुलै रोजी 'प्यार तूने क्या किया' (Pyar Tune Kya Kiya) ,रोड (Road) ,उम्मीद (Ummeed), लव इन नेपाल (Love In Nepal) यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शक रजत मुखर्जी यांचे निधन झाले आहे. किडनीच्या समस्येमुळे रजत यांचे निधन झाले. त्यांनी शनिवारी जयपूरमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडला आणखी एक धक्का बसला आहे. मुंबईत वास्तव्यास असणारे रजत मुखर्जी लॉकडाऊन काळात त्यांच्या शहरात जयपूरमध्ये होते. दीर्घकाळापासून ते किडनीच्या समस्येला तोंड देत होते. दरम्यान त्यांचे निधन किडनी समस्या तसंच Lungs Infection मुळे झाल्याचे समोर येत आहे. (हे वाचा-रेखाजींनी कोरोना चाचणी करून घ्यावी - मुंबईच्या महापौरांचं आवाहन) दिग्दर्शक रजत मुखर्जी यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मित्र आणि अभिनेता मनोज वाजपेयीने ट्वीट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने असे लिहिले आहे की, 'माझा मित्र आणि रोडचा दिग्दर्शक रजत मुखर्जी याचा जयपूरमध्ये आजाराशी दीर्घकाळ लढताना मृत्यू झाला आहे. तुला शांती लाभो. माझा अजूनही विश्वास बसत नाही आहे की आता आपण भेटू शकत नाही आणि पुन्हा एकदा एकत्र काम करू शकत नाही. जिथे आहेस तिथे खूश राहा'. त्यांचे 'रोड' या राम गोपाल वर्माने निर्मिती केलेल्या सिनेमाचे काम लक्षात राहणारे आहे. 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या या  सिनेमाममध्ये विवेक ऑबेरॉय आणि अंतरा माळी मुख्य भूमिकेत होते. त्याचप्रमाणे 2001 मध्ये त्यांचा उर्मिला मातोंडकर, फरदीन खान आणि सोनाली कुलकर्णी स्टारर 'प्यार तूने क्या किया' या सिनेमा प्रदर्शित झाला होता. दरम्यान काही मीडिया अहवालांच्या मते ते काही दिवसात नवीन सीरिज देखील प्रेक्षकांसाठी घेऊन येणार होते.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या