Home /News /entertainment /

बापाच गाणं सोडून अल्लू अर्जुनच्या मुलीचा ‘कच्चा बादाम' वर जबरदस्त डान्स, क्यूट Video Viral

बापाच गाणं सोडून अल्लू अर्जुनच्या मुलीचा ‘कच्चा बादाम' वर जबरदस्त डान्स, क्यूट Video Viral

‘कच्चा बादाम’ (Kacha Badam) या गाण्यावर अल्लू आर्जुनची मुलगी (Allu Arha) ने देखील जबरदस्त डान्स केला आहे. सध्या सोशल मीडियवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  मुंबई, 10 फेब्रुवारी- पुष्पा (Pushpa) सिनेमाला मिळालेल्या यशानंतर अल्लू अर्जुन (Allu Arjun) ग्लोबल स्टार बनला आहे. सर्वसामान्य जनता असेल किंवा सेलेब्स सर्वांना पुष्पाचा फिवर चढला आहे. या सिनेमातीर गाणी, डायलॉग असुदे की अल्लू आर्जुनची वॉकिंग स्टाईल असेल सर्वच हिट आहे. यावर रोज एक नवीन रील पाहायला मिळते. आता या सगळ्यात ‘कच्चा बादाम’ (Kacha Badam) हे गाणं देखील सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या गाण्याची देशातच नाही तर परदेशात देखील क्रेझ पाहायला मिळत आहे. आता या गाण्यावर अल्लू आर्जुनची मुलगी (Allu Arha) ने देखील जबरदस्त डान्स केला आहे. सध्या सोशल मीडियवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अरहा अल्लूच्या क्यूटनेसने जिंकले चाहत्यांचे मन नुकताच ‘कच्चा बादाम’ गाण्यावर अरहा अल्लूने (Allu Arha Dance) देखील भन्नाट डान्स केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अल्लू अर्जुनने हा व्हिडिओ रिकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत अरहाचा क्यूटनेस पाहून चाहते यावर कमेंटचा वर्षाव करत आहेत. अरहाच्या या व्हिडिओला 24 तासात 2 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाल्या आहेत. तर आतापर्यंत अल्लू अर्जुनच्या या मुलीच्या व्हिडिओवक 22 हजारापेक्षा जास्त कमेंट आल्या आहेत. वाचा-प्रशांत दामलेंचा काहीतरी आणि कसंतरी होतंयचा मजेदार VIDEO पाहिला का? सोशल मीडियावर अरहा अल्लूची हवा अल्लू अर्जुनने व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, ‘My Lil Badham Arha…’ आता या रीलने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओनंतर अरहाच्या नावाचा समावेश मोस्ट व्हायरल सोशल मीडिया किड्समध्ये झालं आहे. विशेष म्हणजे सर्वजण अल्लू आर्जुनच्या पुष्पावर रील बनवत आहेत. अशातत अल्लू अर्जुनच्या मुलीनं बापाच्या गाण्यावर एकही रील बनवता या नवीन गाण्यावर रील बनवलं आहे. या व्हिडिओमध्ये अरहाच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यालायक आहेत.
  समंथाच्या ‘Shaakuntalam’मधून डेब्यू करणार आहे अरहा अल्लू अल्लू अर्जुनची मुलगी अरहा Gunasekhar निर्देशित समंथा रुथ प्रभु स्टारर फिल्म ‘Shaakuntalam’मध्ये दिसणार आहे. अरहा अल्लूची ही डेब्यू फिल्म असणार आहे. ‘शाकुंतलम ’ च्या सेटवर मुलीचा अभिनय पाहण्यासाठी अल्लू अर्जुन याने देखील हजेरी लावले होते. आता चाहते अरहाच्या सिनेमाची वाट पाहत आहेत.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Allu arjun, Entertainment, Tollywood

  पुढील बातम्या