Home /News /entertainment /

'koffee with karan' मध्ये साऊथ स्टार्स लावणार हजेरी,अल्लू-रश्मिका उघडणार मोठी सीक्रेट्स

'koffee with karan' मध्ये साऊथ स्टार्स लावणार हजेरी,अल्लू-रश्मिका उघडणार मोठी सीक्रेट्स

सर्वात लोकप्रिय चॅट शोमधील एक म्हणून 'कॉफी विथ करण'ला (koffee with karan Season 7) ओळखलं जातं. अनेक लोक या शोची आतुरतेने वाट पाहात असतात.

    मुंबई, 6 मे-  सर्वात लोकप्रिय चॅट शोमधील एक म्हणून 'कॉफी विथ करण'ला  (koffee with karan Season 7) ओळखलं जातं. अनेक लोक या शोची आतुरतेने वाट पाहात असतात. या शोमध्ये प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रेटी हजेरी लावतात. इतकंच नव्हे तर ते आपल्या खाजगी आणि व्यावसायिक आयुष्यातील अनेक गुपिते उघड करतात. त्यामुळे प्रेक्षक नेहमीच हा शो पाहण्यासाठी उत्सुक असतात. या शोची गेली सहा सीजन प्रचंड लोकप्रिय ठरली होती. त्यांनतर आता प्रेक्षकांना सातव्या सीजनची प्रतीक्षा लागून आहे. लवकरच 'कॉफी विथ करण सीजन 7' सुरू होणार आहे. चित्रपट निर्माता-होस्ट करण जोहर  (Karan Johar)  या सीजनमध्ये अनेक साऊथ सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यास तयार आहेत. दरम्यान, साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरहिट ठरलेली जोडी बॉलिवूडच्या प्रसिद्ध निर्मात्याच्या चॅट शोमध्ये दिसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करण जोहर लवकरच या शोमध्ये 'पुष्पा' या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा स्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदना यांच्यांशी संवाद साधताना दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार,'कॉफी विथ करण' ची टीम आधीच अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदनाजवळ पोहोचली आहे. आणि ते यासाठी खूप उत्सुक आहेत.काही दिवसांपूर्वी आलेल्या 'पुष्पा' या चित्रपटातून अल्लू आणि रश्मिका फक्त देशातच नव्हे तर जगभरात वाहवाह मिळवत आहेत. या चित्रपटाने या कलाकरांना नवी ओळख मिळवून दिली आहे. त्यांच्या अभिनयाचंसुद्धा प्रचंड कौतुक करण्यात आलं होतं. या चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ माजवला होता. आता हे स्टार करण जोहरच्या शोमध्ये आपली अनेक गुपिते उघड करताना दिसणार आहेत. नुकतंच करण जोहरने एक रिपोर्ट शेअर केला होता की, त्याचा चॅट शो यावेळी ओटीटीवर दिसणार आहे.करण जोहरने सोशल मीडियावर लिहिलं होतं, "कॉफी विथ करण टीव्हीवर परत येणार नाही... कारण प्रत्येक चांगल्या कथेला एक चांगला ट्विस्ट आवश्यक आहे. मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, कॉफ़ी विथ करणचा सीजन 7 केवळ डिस्ने + हॉटस्टारवर स्ट्रीम होईल."
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Allu arjun, Entertainment, Karan Johar, Rashmika mandanna

    पुढील बातम्या