Home /News /entertainment /

Samantha च्या Oo antava विरोधात 'या' कारणामुळे तक्रार झाल्याने वादाच्या भोवऱ्यात, तरीही सुपर ट्रेंड झालं गाणं!

Samantha च्या Oo antava विरोधात 'या' कारणामुळे तक्रार झाल्याने वादाच्या भोवऱ्यात, तरीही सुपर ट्रेंड झालं गाणं!

समंथाचं हे गाण युट्युबच्या 2021 च्या ट्रेंड लिस्टमध्ये देखील होतं. तिच्या सिझलिंग डान्स मुव्ह्जनी (Samantha Sizziling Dancee Moves) चाहत्यांना वेड लावलं होतं. दरम्यान समंथा-अल्लूचं हे धमाकेदार गाणं वादाच्या भोवऱ्यातही अडकलं होतं.

पुढे वाचा ...
    मुंबई, 17 मार्च: अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna)स्टारर ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa: the rise) या सिनेमाला देशातच नाही तर परदेशातही उदंड प्रतिसाद मिळाला. या सिनेमातील गाणी सोशल मीडियावर आजही ट्रेंड करत आहे. दरम्यान या सिनेमात एक आयटम साँग करणाऱ्या समंथाचीही जोरदार चर्चा झाली. समंथाने या सिनेमात 'ऊ अंटवा..'(Oo Antava) या गाण्यावर डान्स केला. ज्यात तिचा बोल्ड अँड ब्युटिफुल अंदाज पाहायला मिळाला. या गाण्यावर लाखो रील्स बनताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हे गाणं विशेष लोकप्रिय झालं. दरम्यान या गाण्याला आतापर्यंत 20 कोटींपेक्षा जास्त Views मिळाले आहेत. हिंदी भाषेतील या गाण्याचं व्हर्जनही लोकप्रिय ठरलं आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं समंथाचं हे गाणं समंथाचं हे गाण युट्युबच्या 2021 च्या ट्रेंड लिस्टमध्ये देखील होतं. तिच्या सिझलिंग डान्स मुव्ह्जनी (Samantha Sizziling Dance Moves) चाहत्यांना वेड लावलं होतं. दरम्यान समंथा-अल्लूचं हे धमाकेदार गाणं वादाच्या भोवऱ्यातही अडकलं होतं. या गाण्यावर पुरुषांच्या एका संघटनेने आक्षेप घेत गाणं बॅन करण्याची मागणी केली होती. या गाण्याच्या विरोधात पुरुषांच्या एका गटाने आंध्र प्रदेशातील न्यायालयात धाव घेतली होती. हे वाचा-अल्लूच्या पुष्पा 2ची प्रदर्शनाआधी हवा! बड्या प्रोडक्शन हाऊसकडून 400 कोटींची ऑफर तेलुगू मीडियाच्या वृत्तानुसार, पुरुषांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेने या गाण्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या याचिकेत गाण्यावर आक्षेप घेण्यात आला होता. या गाण्यातील शब्दांबद्दल असे बोलले जात होते की, हे गाणे पुरुषांची वासंनाध विचारसरणी मांडत आहे. त्यांचे मन फक्त अश्लिल गोष्टींचाच विचार करत असते, अशाप्रकारे चित्रित केल्याने ही याचिका दाखल करण्यात आली होती. हे गाणे तमिळमध्ये तेलगूमध्ये 'ओ सोलेरिया' आणि 'ओ अंटावा' अशा लिरिक्ससह रिलीज करण्यात आले होते. वादात अडकल्यानंतरही या गाण्याने यूट्यूबवर 200 मिलियनहून अधिक व्ह्यूज पार केले आहेत. या गाण्याचे हिंदी व्हर्जन ' Oo Bolega ya Oo Oo Bolega' हे बॉलीवूड गायिका कनिका कपूरने गायले होते, जे 21 कोटींहून अधिक म्हणजेच 210 दशलक्ष लोकांनी पाहिले आहे. तर तेलुगू व्हर्जन इंद्रावती चौहान (Indravati Chauhan) ने गायलं आहे. या चित्रपटातील आणखी एक 'श्रीवल्ली' गाणे आतापर्यंत 100 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. निर्माते आता 'पुष्पा: द रुल' चित्रपटाचा दुसरा भाग एप्रिल 2022 पासून शूट करण्याच्या तयारीत आहेत.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Allu arjun, Rashmika mandanna

    पुढील बातम्या