मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /OMG! विजय देवरकोंडा नव्हे तर या दोन मुलांच्या पित्याला रश्मिका मंदना समजते आपला क्रश

OMG! विजय देवरकोंडा नव्हे तर या दोन मुलांच्या पित्याला रश्मिका मंदना समजते आपला क्रश

साऊथ अभिनेत्री  (South Actress)  रश्मिका मंदनाने   (Rashmika Mandanna)  अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. आपलं सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर तिने नॅशनल क्रशचा  (National Crush)   टॅग मिळवला आहे.

साऊथ अभिनेत्री (South Actress) रश्मिका मंदनाने (Rashmika Mandanna) अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. आपलं सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर तिने नॅशनल क्रशचा (National Crush) टॅग मिळवला आहे.

साऊथ अभिनेत्री (South Actress) रश्मिका मंदनाने (Rashmika Mandanna) अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. आपलं सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर तिने नॅशनल क्रशचा (National Crush) टॅग मिळवला आहे.

मुंबई, 31 डिसेंबर-  साऊथ अभिनेत्री  (South Actress)  रश्मिका मंदनाने   (Rashmika Mandanna)  अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. आपलं सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर तिने नॅशनल क्रशचा  (National Crush)   टॅग मिळवला आहे. आज ही अभिनेत्री तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. ती नेहमीच आपल्या क्युट एक्स्प्रेशनने तरुणांना घायाळ करत असते. परंतु ही अभिनेत्री चक्क एका लग्न झालेल्या अभिनेत्याच्या प्रेमात आहे. वाटलं ना आश्चर्य? खरं तर ही अभिनेत्री त्याची फार मोठी चाहती आहे. तिला आपला ड्रीम बॉय समजते. आणि त्याच्यासोबत काम करायची स्वप्नं पाहाते. पाहूया कोण आहे हा अभिनेता?

अभिनेत्री रश्मिका मंदनाने अनेक साऊथ चित्रपटांमधून आपली खास ओळख निर्माण केली आहे. अनेक अभिनेते तिच्यासोबत काम करायची स्वप्न पाहतात. आज रश्मिकाचे कोट्यावधी चाहते आहेत. तसेच ही अभिनेत्रीसुद्धा एका अभिनेत्याची फार मोठी चाहती आहे. हा अभिनेता दुसरा कोणी नसून साऊथ सुपरस्टार मास्टर थालापती फेम विजय  (Master Vijay)  आहे. हो हे खरं आहे. अभिनेत्री रश्मिका मंदना विजयची फार मोठी चाहती आहे. रश्मिकाला विजयसोबत काम करण्याची फार इच्छा आहे. 'पुष्पा' फेम या अभिनेत्रीने स्वतः आपल्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान या गोष्टीचा खुलासा केला आहे. रश्मिकाने 'भीष्म' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान म्हटलं होतं, 'एक तामिळ सुपरस्टार माझा फार मोठा क्रश आहे. आणि मला त्यांच्यासोबत काम करायचं आहे'.

खऱ्या आयुष्यात पाहायला गेलं तर अभिनेत्रीला त्याचा सहकलाकार विजय देवरकोंडा आवडत असल्याचं म्हटलं जातं. विजय आणि रश्मिकाने गीता गोविंदा आणि डिअर कॉम्रेडमध्ये एकत्र काम केलं आहे. हे दोन्ही चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरले होते. यामधील रश्मिका आणि विजयची केमिस्ट्री चाहत्यांना फारच पसंत पडली होती. या दोन्ही चित्रपटांनंतर चाहते या दोघांना रिअल लाईफ कपल म्हणून पाहतात. हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जातं. मात्र अजूनही या दोघांनी कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही.

रश्मिका सध्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. अभिनेत्री लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत मिशन मजनू आणि अमिताभ बच्चनसोबत गुड बाय या चित्रपटात झळकणार आहे. यासाठी ती सध्या मुंबईमध्येच दिसून येते. तसेच अभिनेता विजय देवरकोंडासुद्धा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अभिनेता लवकरच अनन्या पांडेसोबत 'लायगर' या बहुचर्चित चित्रपटात झळकणार आहे.

(हे वाचा:कतरिना कैफचा दीर या मराठी मुलगीला करतोय DATE? अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा)

रश्मिका सध्या 'पुष्पा' चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाची कथा लाल चंदन तस्करीवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये रश्मिका आणि अल्लू अर्जुन फारच वेगळ्या रूपात आहेत. यामध्ये दोघांनी आदिवासी लूक कॅरी केला आहे. त्यांचा हा लूक पाहून प्रेक्षक चकित झाले होते. चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरत आहे. अत्तापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे अनेक रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. चित्रपट पाहून चाहते रश्मिका आणि अल्लू अर्जुनच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक करत आहेत. शिवाय रश्मीकच्या गाण्यातील एक हुक स्टेपसुद्धा फेमस होत आहे.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Rashmika mandanna, South actress