मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अभिनेत्री रश्मिका मंदानाने खऱ्या आयुष्यात 'या' अभिनेत्यासोबत मोडलाय साखरपुडा, पाहा फोटो

अभिनेत्री रश्मिका मंदानाने खऱ्या आयुष्यात 'या' अभिनेत्यासोबत मोडलाय साखरपुडा, पाहा फोटो

Pushpa fame actress rashmika mandanna broke engagement with kannada actor rakhit shetty

Pushpa fame actress rashmika mandanna broke engagement with kannada actor rakhit shetty

पुष्पा फेम श्रीवल्ली म्हणजेच अभिनेत्री रश्मिका मंदाना लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. तिच्या बॉलिवूड एंट्रीची सर्वांनाच उत्सुकता परंतु तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी तितकीच चर्चा होत आहे.

मुंबई, 18 मे - देशातल्या तमाम प्रेक्षकांची नॅशनल क्रश आणि पुष्पाची (Pushpa)  श्रीवल्ली (Shrivalli)  म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री रश्मीका मंदाना (Rashmika Mandanna) रश्मीका सध्या "पुष्पा द राइज" (Pushpa The Rise) या सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आहे. सिनेमा थिएटरमधून गेला असला तरी पुष्पा आणि त्याच्या श्रीवल्लीचा सिलसीला काही कमी झालेला नाही. साऊथ सिनेमात आपला ठसा उमटवल्यानंतर रश्मिका आता बॉलिवूडमध्ये येण्यासाठी सज्ज झाली आहे. रश्मिकाच्या बॉलिवूड डेब्यूची सध्या जितकी चर्चा सुरू आहे तितकीच तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी तिच्या जोडीदाराविषयी देखील चांगलीच चर्चा आहे. रश्मिका मंदाना सध्या सिंगल आहे. परंतु 2017मध्ये तिचा साखरपुडा देखील झाला होता. परंतु त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. काय आहे रश्मिका मंदानाची लव्ह स्टोरी? जाणून घ्या.

अभिनेत्री रश्मिका मंदानाचा रक्षित शेट्टीसोबत (Rakshit Shetty) साखरपुडा झाला होता. रक्षित हा देखील सिनेसृष्टीशी निगडीत असून कन्नडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. "किरिक पार्टी" या सिनेमातून रश्मिका आणि रक्षित यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. याच सिनेमावेळी दोघांची मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघे एकमेंकांचे बेस्ट फ्रेंड होते. आयुष्यभरासाठी एकत्र येण्यासाठी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2017 साली त्यांनी साखरपुडा केला. आयु्ष्यभरासाठी एकत्र येण्यासाठी निघालेल्या रश्मिका आणि रक्षित यांच्या प्रेमाची गाडी मध्येच अडली आणि साखरपुड्याच्या अवघ्या 14 महिन्यांनी दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा -  'Video' च्या नादात प्रार्थना बेहेरे हे काय करून बसली...मोबईल डोक्यावर पडल्यामुळं आलं भलंमोठं टेंगुळ

रश्मिका रक्षित यांच्या ब्रेकअप नंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. दोघांनी नात्याला पूर्णविराम का दिला याबाबत त्यांनी कधीही उत्तर दिले नसले तरी त्याच्या नात्याविषयी अनेक चर्चा होत असतात. असे म्हटले जाते की, दोघांमध्ये त्यांच्या कामांसंदर्भात समजूतदारपणा नव्हता. तर काहींच्या मते, दोघांच्या कुटुंबामुळे त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. इतक्या चर्चांतरही दोघांनी कधीच त्यांच्या नात्याविषयी भाष्य केलं नाही.

रश्मिकाच्या अपकमिंग प्रोजेक्टबाबत बोलायचं झालं तर रश्मिका बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidhart Malhotra) सोबत "मिशन मजनू" (Mission Majnu) या सिनेमात दिसणार आहे. इतकंच नाही तर बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबतही रश्मिका "गुडबाय" (Good By) या सिनेमात काम करणार आहे. 3 तगड्या बॉलिवूड सिनेमातून रश्मिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यातील तिसरा सिनेमा रश्मिका लवकरच साइन करणार असल्याचे म्हटलं जात आहे.

First published:

Tags: Bollywood, Rashmika mandanna, Tollywood