मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Pushpa: अल्लू अर्जुन-रश्मिका मंदनामधील अ‍ॅडल्ट सीन पाहून संतापले प्रेक्षक; निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय

Pushpa: अल्लू अर्जुन-रश्मिका मंदनामधील अ‍ॅडल्ट सीन पाहून संतापले प्रेक्षक; निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय

रेकॉर्ड ब्रेक कमाई करत असलेल्या 'पुष्पा'च्या या सीनवर प्रेक्षक नाराज

रेकॉर्ड ब्रेक कमाई करत असलेल्या 'पुष्पा'च्या या सीनवर प्रेक्षक नाराज

रेकॉर्ड ब्रेक कमाई करत असलेल्या 'पुष्पा'च्या या सीनवर प्रेक्षक नाराज

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 21 डिसेंबर-   अल्लू अर्जुन   (Allu Arjun)  आणि रश्मिका मंदना   (Rashmika Mandanna)  यांचा 'पुष्पा: द राइज - पार्ट 1' (Pushpa: the Rise part-1) नं फक्त प्रेक्षकांची मनं जिंकली नाहीत, तर बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त कमाई केली आहे. या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड मोडत अवघ्या तीन दिवसांत 200 कोटींचा गल्ला जमवला आहे. 7 डिसेंबर ला तब्बल 5 भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखेचं प्रेक्षक कौतुक करत आहे. या चित्रपटाचा हिंदी व्हर्जन पाहून अल्लू अर्जुन, रश्मिका मंदना आणि समंथा रुथ प्रभू यांच्या अभिनयाला उत्तर भारतातील लोकांनीही भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. परंतु, इथे आम्ही तुम्हाला पुष्पाविषयी एक अशी माहिती देणार आहोत, जी अद्याप सर्वांना माहिती नसेल.

नुकताच रिलीज झालेल्या 'पुष्पा'च्या निर्मात्यांना किरकोळ झटका बसला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण या चित्रपटात एका अशा सीनचा समावेश आहे, जो कुटुंबासोबत बसून पाहता येत नाही. याच अ‍ॅडल्ट सीनमुळे चित्रपटाबाबत ऑनलाइन वाद निर्माण झाला आहे. हा तो सीन आहे जिथे रश्मिका मंदना श्रीवालीच्या भूमिकेत पुष्पा राज म्हणजेच अल्लू अर्जुनबद्दलच्या तिच्या भावना व्यक्त करते. यावेळी श्रीवल्ली पुष्पा राजला स्पर्श करून त्याला आपल्या प्रेमाची जाणीव करून देत असते.

चित्रपटातून काढून टाकला जाणार हा अ‍ॅडल्ट सीन-

असं सांगितलं जात आहे की, पुष्पाचा हा सीन आता काढून टाकण्याचा निर्णय चित्रपट निर्मात्यांनी घेतला आहे. कारण हा प्रौढ लोकांसाठी असलेला सीन आहे आणि त्यामुळे चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहताना कौटुंबिक प्रेक्षक अस्वस्थ होऊ शकतात. चित्रपटाचं ट्रिम केलेलं व्हर्जन 20 डिसेंबरपासून थिएटरमध्ये सुरू झालं आहे. पुष्पाच्या तीन तासांच्या कालावधीमुळे चित्रपटातील आणखी काही दृश्ये कमी केली जाऊ शकतात, असंही बोललं जात आहे.

(हे वाचा:'पुष्पा द राईज' चित्रपटाने मोडले सर्व रेकॉर्ड,बॉक्स ऑफिसवर केली कोट्यवधींची कमाई)

पुष्पा: द राईजचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केलं असून त्याची कथा आंध्र प्रदेशातील शेषाचलम हिल्समधील लाल चंदन तस्करांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग २०२२ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Allu arjun, Entertainment, Rashmika mandanna