Home /News /entertainment /

'व्हिक्टोरिया' चित्रपटातील सोनाली कुलकर्णीचा फर्स्ट लुक OUT, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

'व्हिक्टोरिया' चित्रपटातील सोनाली कुलकर्णीचा फर्स्ट लुक OUT, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

Sonalee Kulkarni

Sonalee Kulkarni

निर्माता आनंद पंडित आणि अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) यांचा 'व्हिक्टोरिया' (Victoria) हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतचं चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला आहे.

  मुंबई, 28 जानेवारी: निर्माता आनंद पंडित आणि अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) यांचा 'व्हिक्टोरिया' (Victoria) हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतचं चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला आहे. व्हिक्टोरिया' या चित्रपटात अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog), सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) आणि आशय कुलकर्णी (Aashay Kulkarni) हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हीरा सोहल ही अभिनय क्षेत्रात पदार्पण करत असून जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी हे दिग्दर्शनात पदार्पण या चित्रपटामधून करत आहेत. नुकतंच या चित्रपटातील प्रमख कलाकारांचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाच्या चेहऱ्यावर जखमी असलेल्या खुणा पाहायला मिळत आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील हावभाव काहीतरी दर्शवताना दिसत आहेत. त्यांचा हा लूक पाहता, चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
  ती आणि ती, वेल डन बेबी या चित्रपटाच्या यशानंतर आनंद पंडित मोशन पि्चर्स एल एल पी आणि गुसबम्प्स एंटरटेनमेंट पुन्हा एकदा व्हिक्टोरिया हा एक नवीन चित्रपट घेऊन येत आहेत. 'व्हिक्टोरिया' चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद ओमकार गोखले, जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. आनंद पंडित, रूपा पंडित आणि पुष्कर जोग हे ‘व्हिक्टोरिया’ या चित्रपटाचे निर्माते आहेत तर वैशल शाह सह निर्माता आहेत. या बिग बजेट चित्रपटाचे शूटिंग स्कॉटलंड येथे होणार आहे . .
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Marathi entertainment, Sonalee Kulkarni

  पुढील बातम्या