मुंबई, 04 जानेवारी : आहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित पुण्यश्लोक अहिल्याबाई (Punyashlok Ahilyabai) ही मालिका आजपासून सोनी टीव्हीवर सुरू होणार आहे. या मालिकेमध्ये अदिती जलतरे (Aditi Jaltare) ही मराठमोळी बालकलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अदिती या मालिकेत अहिल्याबाईंच्या बालपणीची भूमिका साकारणार आहे. ही भूमिका मिळवण्यासाठी अदितीला तब्बल 1000 मुलींशी स्पर्धा करावी लागली होती. या भूमिकेसाठी 1 हजार मुलींनी ऑडिशन दिली होती. त्यामध्ये अदितीने बाजी मारली आहे.
अदितीने या आधीच बालकलाकार म्हणून कामाला सुरुवात केली आहे. सिंधू या मालिकेत अदितीने मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेतील तिच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं. तसंच मेरे साई या मालिकेतही तिने छोटीशी भूमिका केली होती. अवघ्या 10 वर्षाच्या अदितीसाठी अहिल्याबाईंची भूमिका मिळवणं सोप्पं काम नव्हतं. ऑडिशनची सगळी प्रोसेस तब्बल 8 महिने सुरू होती.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी या मालिकेचे दिग्दर्शक जॅक्सन सेठी म्हणातात, ‘अहिल्यादेवींची भूमिका साकारणं अतिशय आव्हानात्मक आहे. त्यासाठी आम्ही एका निरागस मुलीच्या शोधात होतो. मला असं वाटतं की, अदितीने लहानपणीच्या आईल्याबाईंची भूमिका सक्षमपणे साकारली आहे.’
पुण्यश्लोक अहिल्यादेवी ही मालिका आजपासून सुरू होत आहे. या मालिकेत अदितीसोबतच, राजेश श्रृंगारपुरे, स्नेहलता वसईकर, क्रिश चौहान, सुखदा खांडकेकर, भाग्यश्री, आर्यन प्रीत हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
Published by:Amruta Abhyankar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.