मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचा Social mediaला रामराम; शेवटची पोस्ट करत सांगितलं कारण

प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचा Social mediaला रामराम; शेवटची पोस्ट करत सांगितलं कारण

आत मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने काही काळासाठी सोशल मीडियाला रामराम ठोकला आहे म्हणजे ब्रेक घेतला आहे. याच कारण देखील तिनं इन्स्टा पोस्ट करत दिलं आहे.

आत मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने काही काळासाठी सोशल मीडियाला रामराम ठोकला आहे म्हणजे ब्रेक घेतला आहे. याच कारण देखील तिनं इन्स्टा पोस्ट करत दिलं आहे.

आत मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने काही काळासाठी सोशल मीडियाला रामराम ठोकला आहे म्हणजे ब्रेक घेतला आहे. याच कारण देखील तिनं इन्स्टा पोस्ट करत दिलं आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 18 ऑक्टोबर : मराठी मनोरंजन विश्वातील सर्वच कलाकार आता सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात अॅक्टीव असतात. प्रत्येकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट राहत असतं. आत मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने काही काळासाठी सोशल मीडियाला (social media break) रामराम ठोकला आहे म्हणजे ब्रेक घेतला आहे.

ही अभिनेत्री म्हणजे 'पुण्यश्लोक अहिल्याबाई' या मालिकेत अहिल्याबाईच्या सासूबाईची म्हणजे गौतमाबाईंची भूमिका साकारणारी स्रेहलता वसईकर (Snehlata Vasaikar ) आहे. आता ती काही काळ सोशल मीडियावर दिसणार नाही आहे. स्रेहलताने काही काळ सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत, तिने खुद्द याबद्दल माहिती दिली आहे.

स्रेहलता वसईकरने इन्स्टा पोस्ट करत म्हटले आहे की, अध्यात्मिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी काही काळ ऑफलाईन जात आहे. स्रेहलताच्या या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी तिच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे तर काहींनी तिच्या या निर्णयाचें कौतुकही केले आहे.

वाचा :जेव्हा घरात पाल येते... सिद्धार्थ-मिताली सेलेब्रिटी कपलच्या घरातला VIDEO आला बाहेर

स्रेहलताने ‘फु बाई फु’ मधून मराठी सृष्टीत पदार्पण केले होते. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेत सोयरा बाईसाहेबांची तिने साकारलेली भूमिका विशेष गाजली व ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली.या मालिकेने तिला अभिनेत्री म्हणून खरी ओळख दिली. यासोबतच संजय लीला भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमात तिने साकारलेल्या भानूच्या भूमिकेचे व तिच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. अभिनयासोबतच स्नेहलता तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते.

बॉलिवूडमधल्या काही कलाकारांनीसुद्धा सोशल मीडियापासून ब्रेक घेतला आहे तर काहींनी कायमचं अकाऊंट डिलिट केलं आहे. काहींनी ट्रोलिंगला वैतागून तर काहींनी स्वत:ला वेळ देण्यासाठी हा निर्णय घेतला. अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने काही महिन्यांपूर्वी ट्विटर अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला होता. सोशल मीडियावर वाढतं ट्रोलिंगचं प्रमाण आणि नकारात्मक चर्चा यांमुळे त्याने हा निर्णय घेतल्याचं नंतर स्पष्ट केलं होतं.

First published:

Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Tv actress, TV serials