• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • कोरिओग्राफर पुनीत पाठक चढला बोहल्यावर; लग्नातला भारती सिंहचा डान्स VIDEO व्हायरल

कोरिओग्राफर पुनीत पाठक चढला बोहल्यावर; लग्नातला भारती सिंहचा डान्स VIDEO व्हायरल

कोरिओग्राफर पुनीत पाठकचं (Puneet Pathak) धुमधडाक्यात लग्न झालं आहे. त्याच्या लग्नात भारती सिंहने (Bharti Singh) केलेला डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

  • Share this:
मुंबई, 12 डिसेंबर: डान्स इंडिया डान्स’(DID) या  शोमधून प्रकाशझोतात आलेला ॲक्टर आणि कोरिओग्राफर पुनीत पाठकने(Punit Pathak) गर्लफ्रेंड निधी मूनी सिंहशी(Nidhi Singh) लग्नगाठ बांधली. लोणावळ्यातील एका रिसॉर्टमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. या लग्नाला पुनीत पाठक याच्या काही निवडक मित्रांनी हजेरी लावली. या दोघांच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असून यामध्ये दोघेही लग्नाचा आनंद घेत असल्याचे दिसून येत आहे. पुनीत आणि निधी या दोघांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले असून यामध्ये दोघेही खूप आनंदी दिसून येत आहेत. मंगळवारी पुनीतने एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये आपल्या लग्नाची माहिती दिली होती. या पोस्टमध्ये त्याने ही तारीख आयुष्यभर आमच्यासोबत राहणार आहे. 11 डिसेंबर या दिवशी आमचे आयुष्य बदलणार असून आमच्या आयुष्यातील नवीन काळ सुरु होणार आहे. असं लिहीलं होतं. निधी सिंह हिला या पोस्टमध्ये टॅग करत त्याने तू, मी आपल्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरु होणार असल्याचंही म्हटलं होतं. पुनीतच्या लग्नाला कॉमेडियन भारती सिंह(Bharati Singh) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया(Harsh Limbachiya) दोघांनी हजेरी लावली होती. लग्नात दोघांनीही जोरदार डान्स केला असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुनीत पाठक याने या ऑगस्ट महिन्यात आपली गर्लफ्रेंड निधी सिंह हिच्याशी साखरपुडा केला होता.त्यानंतर काल अखेर ते लग्नबंधनात अडकले.
आपल्या या लग्नसोहळ्यात दोघांनीही शानदार कपडे परिधान केल्याचे आपल्याला दिसून येत आहे. पुनीतने लग्नामध्ये लाईट पिंक रंगाची शेरवानी घातलेली होती. त्यावर पीच रंगाची पगडी देखील घातली होती. तर निधीने पिंक रंगाचा घागरा घातला होता. यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. तिने घातलेले दागिने तिच्या रूपामध्ये आणखी भर घालत होते. पुनीत पाठकने आतापर्यंत अनेक रिऍलिटी शोमध्ये काम केले असून अनेक शोमध्ये जज म्हणूनदेखील काम केलं आहे. त्याचबरोबर डान्सवर आधारित एबीसीडी(ABCD) या सिनेमात देखील त्याने भूमिका केली असून नावाबजादे या सिनेमातदेखील मुख्य भूमिका पार पाडली आहे.
Published by:Amruta Abhyankar
First published: