मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Puneeth Rajkumarची शेवटची झलक पाहण्यासाठी उसळला चाहत्यांचा महासागर; शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Puneeth Rajkumarची शेवटची झलक पाहण्यासाठी उसळला चाहत्यांचा महासागर; शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

अभिनेता पुनीत राजकुमारने (Puneeth Rajkumar Passes Away) वयाच्या ४६(46 Years Old) व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. साऊथचा सुपरस्टार पुनीत यांचं शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 30ऑक्टोबर- अभिनेता पुनीत राजकुमारने (Puneeth Rajkumar Passes Away) वयाच्या ४६(46 Years Old) व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. साऊथचा सुपरस्टार पुनीत यांचं शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना शुक्रवारी सकाळी बेंगळुरूच्या विक्रम हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र तेथे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुनीत राजकुमारच्या निधनानंतर साऊथ फिल्म इंडस्ट्रीसह बॉलिवूडवरही शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर अभिनेत्याच्या चाहत्यांसह सर्व बड्या सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे. पुनीत राजकुमारच्या मृत्यूची (Puneeth Rajkumar Passes Away ) माहिती मिळाल्यानंतर आता चाहत्यांना त्याची एक झलक पाहण्याची उत्कंठा लागली आहे. पुनीतच्या मृत्यूनंतर त्यांचं पार्थिव बेंगळुरू येथील कांतीरवा स्टेडियममध्ये चाहत्यांना आणि कुटुंबियांना पाहण्यासाठी ठेवण्यात आलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अभिनेत्याच्या पार्थिवावर जाऊन श्रद्धांजली वाहिली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक भागात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी सांगितलं की, पुनीत राजकुमार यांच्या पार्थिवावर रविवारी कांतीरवा येथे पूर्ण शासकीय सन्मानानं अंत्यसंस्कार केलं जाईल. एएनआयच्या ट्विटनुसार, अमेरिकेत राहणाऱ्या त्यांच्या मुलीची अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा केली जात आहे. पुनीत राजकुमारची मुलगी भारतात पोहोचल्यानंतरच त्यांना अंतिम निरोप देण्यात येईल. दरम्यान, खबरदारी म्हणून बेंगळुरू पोलिसांनी शहरातील सर्व दारूची दुकाने दोन रात्री बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला शोक व्यक्त- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनीत राजकुमार यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत ट्विटरवर अभिनेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले- 'दुर्दैवाने आम्ही अत्यंत प्रतिभावान अभिनेता पुनीत राजकुमारला गमावलं आहे. हे जाण्याचं वय नाही. येणारी पिढी या महान व्यक्तिमत्वाचं त्यांच्या कार्यातून स्मरण करेल. त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांसाठी माझ्या संवेदना. ओम शांती. '
First published:

Tags: Entertainment, South indian actor

पुढील बातम्या