मुंबई,7 नोव्हेंबर- दक्षिण (South Actor) चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar Death) यांचे २९ ऑक्टोबर रोजी बंगळुरू येथे निधन झाले होते. वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. अशा परिस्थितीत त्यांच्या निधनामुळे फॅमिली डॉक्टर रमण राव यांच्यावर चाहते प्रचंड संतापले असून त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षणही देण्यात आले आहे. त्यांच्या पोलिस संरक्षणाची मागणी करण्यात आल्यानंतर घराच्या बारमध्ये बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पुनीत राजकुमार मृत्यूपूर्वी त्यांचे फॅमिली डॉक्टर रमन राव यांच्याशी बोलले होते. आणि जेव्हा ते त्यांना भेटले होते तेव्हा डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. आता कर्नाटकातील प्रायव्हेट हॉस्पिटल अँड नर्सिंग होम असोसिएशन (PHANA) पुनीतच्या चाहत्यांची नाराजी पाहून चिंतेत आहे. PHANA चे अध्यक्ष प्रसन्न एचएम यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना विनंती केली की 'पुनीत राजकुमारच्या मृत्यूनंतर आरोग्य सेवा ज्या प्रकारे दाखवल्या जात आहेत त्याबद्दल PHANA ला खूप चिंता आहे. तर अभिनेत्याच्या मृत्यूमुळे रुग्णालय प्रशासनालाही मोठा धक्का बसला आहे.मात्र या सर्वाला एका वेगळ्या पद्धतीने दाखवलं जात आहे. त्यामुळे आम्ही सर्वांचं लक्ष आमच्याकडे वेधू इच्छितो.
यासोबतच 'मुख्यमंत्र्यांनी निवेदन देऊन मेडिकलचे मनोबल वाढवावे,' अशी विनंतीही प्रसन्ना यांच्याकडून करण्यात आली आहे. रमण राव आणि अभिनेत्याच्या उपचाराची जबाबदारी असलेल्या सर्व डॉक्टरांना पोलीस संरक्षण देण्यात यावे. मात्र अनेक प्रकारच्या अफवाही पसरत आहेत.’ त्यांनी आपल्या भाषणात असेही म्हटले की, ‘मृत व्यक्तीच्या आरोग्याबाबत चर्चा करणे वैद्यकीय धोरणांचे उल्लंघन करते. 'मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉ. रमण राव यांच्या घराबाहेर केएसआरपीची पलटण तैनात करण्यात आली असून पोलीस चारही ठिकाणी गस्त घालत आहेत.
(हे वाचा:Puneeth Rajkumar ठरला 'रिअल हिरो'; मृत्यूपश्चात चार तरुणांना दिलं ... )
अलीकडेच न्यूज18 कन्नडशी बोलताना डॉ. रमण राव म्हणाले की, पुनीत पत्नी अश्विनीसोबत त्यांच्या क्लिनिकमध्ये आला होता. त्याला अशक्तपणा जाणवत असल्याचे अभिनेत्याने सांगितले. हा शब्द मी त्यांच्या तोंडून कधी ऐकला नाही. मी त्यांना तपासले. त्याचा रक्तदाब नॉर्मल होता. हृदयाचे ठोके स्थिर होते. फुफ्फुस देखील ठीक होते, परंतु त्याला घाम येत होता, जो व्यायामानंतर सामान्य असल्याचे त्यानी सांगितलं. त्याने वजन उचलले, बॉक्सिंग केले आणि इतर व्यायाम केले. त्यानंतर मी त्याचा ईसीजी करण्याचा विचार केला.मला ECG अहवालात चढ-उतार दिसले. मी अश्विनीला ताबडतोब विक्रम हॉस्पिटलमध्ये दाखल करायला सांगितले.
यानंतर पुनीत राजकुमारला २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.४० वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, नंतर पहाटे 2.30 वाजता त्याला मृत घोषित करण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: South indian actor