• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Puneeth Rajkumar ठरला 'रिअल हिरो'; मृत्यूपश्चात चार तरुणांना दिलं जीवदान

Puneeth Rajkumar ठरला 'रिअल हिरो'; मृत्यूपश्चात चार तरुणांना दिलं जीवदान

कन्नडा सुपरस्टार पुनीत राजकुमारने (Puneeth Rajkumar Death) वयाच्या ४६ (46 Years Old) व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. अभिनेता पुनीत यांचं शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं.

 • Share this:
  मुंबई,2 नोव्हेंबर- कन्नडा सुपरस्टार पुनीत राजकुमारने  (Puneeth Rajkumar Death)  वयाच्या ४६ (46 Years Old)  व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. अभिनेता पुनीत यांचं शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना शुक्रवारी सकाळी बेंगळुरूच्या विक्रम हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र तेथे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुनीत राजकुमारच्या निधनानंतर साऊथ फिल्म इंडस्ट्रीसह बॉलिवूडवरही शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर अभिनेत्याच्या चाहत्यांसह सर्व बड्या सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला होता. अभिनेत्याने आधीच नेत्रदान  (Eye Tranceplant) करणार असल्याचं ठरवलं होतं. त्यानुसार त्याच्या मृत्यूंनंतर नेत्रदान करण्यात आलं आहे. समोर आलेल्या रिपोर्टनुसार पुनीत राजकुमाराच्या नेत्रदानमुळे चार तरुणांना नवं जीवदान मिळालं आहे. नारायण नेत्रालय या ठिकाणी पुनीतच्या डोळ्यांचं ट्रान्सप्लांट करण्यात आलं आहे. पुनीतच्या डोळ्यांचं ३ पुरुष आणि १ महिला रुग्णात ट्रान्सप्लांट केल्याचं समोर आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्याच्या दोन्ही डोळ्यांचा नवीन तंत्रज्ञानानानुसार ४ भागात विभाजन करून चार रुग्णांना यशस्वी जीवदान देण्यात आलं आहे. या अभिनेत्याने जिवंतपणी आपल्या अभिनयातून आणि मृत्यूनंतर आपल्या नेत्रदातून चाहत्यांना जीवदान दिलं असंच म्हणावं लागेल. या ट्रान्सप्लांट डॉक्टरांच्या टीममध्ये डॉ. राजकुमार, आय बँकेचे वैद्यकीय संचालक यतीश शिवन्ना आणि सल्लागारांमध्ये डॉ. डी.सूझा, प्रार्थना भंडारी आणि हर्षा नागराज यांचा समावेश होता. या रुग्णांना केलं नेत्रदान- नारायण नेत्रालयचे चेअरमन भुजंग शेट्टी यांनी याबद्दल बोलताना म्हटलं कि, 'पुनीत राजकुमार यांचं नेत्रदान करण्यात आलेले रुग्ण २० ते ३० वयोगटातील आहेत. हे सर्व लोक गेली सहा महिने ट्रांसप्लांटच्या प्रतीक्षेत होते. मात्र कोरोना महामारीमुळे नेत्रदान पूर्णपणे थांबवण्यात आलं होतं. मात्र पुनीतच्या नेत्रदानचा आम्ही या चार रुग्णांसाठी वापर केला आहे. (हे वाचा:हुमा कुरैशीला हॅलोवीन पोस्ट पडली महागात; सोनाक्षी सिन्हाने दिली कायदेशीर नोटीस..) पुनीत राजकुमारच्या मृत्यूची (Puneeth Rajkumar Passes Away ) माहिती मिळाल्यानंतर चाहत्यांना त्याची एक झलक पाहण्याची उत्कंठा लागली होती. पुनीतच्या मृत्यूनंतर त्यांचं पार्थिव बेंगळुरू येथील कांतीरवा स्टेडियममध्ये चाहत्यांना आणि कुटुंबियांना पाहण्यासाठी ठेवण्यात आलं होतं. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अभिनेत्याच्या पार्थिवावर जाऊन श्रद्धांजली वाहिली होती. त्यानंतर अनेक मोठमोठ्या कलाकारांनी उपस्थिती लावली होती, इतकंच नव्हे तर, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक भागात कलम 144 लागू करण्यात आलं होतं.
  Published by:Aiman Desai
  First published: