Home /News /entertainment /

वाजवा रे वाजवा; बॉलिवूडचा आणखी एक हँडसम हंक अडकणार लग्नाच्या बेडीत

वाजवा रे वाजवा; बॉलिवूडचा आणखी एक हँडसम हंक अडकणार लग्नाच्या बेडीत

खतरो कें खिलाडी 9 चा विजेता, नवाबजादे, स्ट्रीट डान्सर अशा चित्रपटांमध्ये काम करणारा अभिनेता 2020 मध्येच लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे.

  मुंबई, 09 डिसेंबर: 2020 मध्ये मराठी इंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी लग्नाचा बार उडवून दिला आहे. नेहा कक्कर, आदित्य नारायण, सई लोकूरचं लग्न अशी अनेक उदाहरणं देता येतील. ABCD आणि नवाबजादे सारख्या चित्रपटात काम केलेला अभिनेता पुनीत पाठकही लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. पुनीत स्वत: कोरिओग्राफरही आहे. त्याने आपल्या इंस्टाग्रामवरुन ही माहिती दिली. गर्लंफ्रेड मोना सिंहशी काही दिवसांपूर्वीच साखरपुडा केला होता. पुनीतने इंन्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहीलं आहे, ’11.12.2020’ एक नवी सुरुवात असं कॅप्शन त्याने दिलं आहे. त्यावरुन तो 11 डिसेंबर रोजी लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे असं दिसत आहे. 26 ऑक्टोबर 2020 मध्ये पुनीत आणि मोनाने साखरपुडा केला होता. ते अनेक वर्षांपासून एकमेंकांना डेट करत होते. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्यांचं लग्न पार पडणार आहे.
  काही दिवसांपूर्वी आदित्य नारायणच्या रिसेप्शनला पुनीतही गेला होता. तिथे त्याने खूप मजा केली. आदित्य आणि पुनीत चांगले मित्र आहेत. पुनीत सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. कामाच्या बाबतीत बोलायचं तर पुनीत खतरो के खिलाड़ी 9 चा विजेता झाला होता. तसंच त्याने ABCD, नवाबजादे अशा अनेक चित्रपटात काम केलं आहे. स्ट्रीट डान्सर 3 या चित्रपटामध्ये त्याने केलेल्या कामाचं कौतुक झालं होतं. या चित्रपटात त्याने श्रद्धा कपूर आणि वरुण धवनसोबत त्याने महत्वाची भूमिका साकारली होती.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Bollywood, Wedding

  पुढील बातम्या