S M L

मैदानावरून सेट हटवा, पुणे विद्यापीठाचा नागराज मंजुळेंना आदेश

नागराज मंजुळेंच्या या सिनेमात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. मात्र आता सात दिवसात नागराज यांना सिनेमाचा सेट हलवावा लागणार आहे

Sachin Salve | Updated On: Feb 9, 2018 07:07 PM IST

मैदानावरून सेट हटवा, पुणे विद्यापीठाचा नागराज मंजुळेंना आदेश

09 फेब्रुवारी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर उभारण्यात आलेला सिनेमाच्या चित्रीकरणाचा सेट सात दिवसात हलवण्यात यावा असं पत्र दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना देण्यात आलंय.

गेल्या दीड महिन्यापासून विद्यापीठाच्या मैदानावर सेट लावून ठेवला होता. मात्र अजुनही सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात देखील करण्यात आली नाहीये. येत्या सात दिवसात विद्यापिठाने योग्य ती कारवाई नाही केली तर सेट जप्त करा असे स्पष्ट आदेश उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी दिले आहेत.

नागराज मंजुळेंच्या या सिनेमात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. मात्र आता सात दिवसात नागराज यांना सिनेमाचा सेट हलवावा लागणार आहे. या सगळ्यावर खुद्द नागराज मंजुळे किंवा बिग बी यांची प्रतिक्रिया मात्र दिली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 9, 2018 07:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close