पुणे- संभाजी उद्यानात रात्री बसविलेला पुतळा पोलिसांनी हटविला

पुण्यातील जंगली महाराज रोडवरील संभाजी महाराज उद्यानातील पुतळ्यावरून पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 19, 2019 09:53 AM IST

पुणे- संभाजी उद्यानात रात्री बसविलेला पुतळा पोलिसांनी हटविला

पुणे, 19 फेब्रुवारी: पुण्यातील जंगली महाराज रोडवरील संभाजी महाराज उद्यानातील पुतळ्यावरून पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. उद्यानात संभाजी महाराज यांचा की राम गणेश गडकरी यांचा पुतळा बसवायचा यावरुन गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरु आहे. त्यात आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर स्वाभिमान संघटनेचा खेड तालुका अध्यक्ष गणेश कारले या तरुणाने मध्यरात्री उद्यानात संभाजी महाराजांचा पुतळा बसवला. त्यानंतर प्रशासनाने हा पुतळा हटवला. आता या प्रकरणावरुन पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.

काय होते प्रकरण

पुण्यातील छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा दोन वर्षापूर्वी काढण्यात आला होता. या पुतळ्याच्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्याची मागणी अनेक संघटनांनी केली होती. या घटनेवरुन पुण्यासोबतच राज्यात देखील वाद झाला होता. पुतळा कोणाचा बसवायचा यावरुन अद्याप वाद सुरु असताना स्वाभिमान संघटनेच्या गणेश कारले या तरुणाने उद्यानात संभाजी महाराजांचा पुतळा बसवला. त्याच बरोबर पुतळ्याच्या खाली एक पत्रक देखील लावले होते. त्यात पुतळा काढल्यास महाराष्ट्रात उद्रेक होईल, असे म्हटले होते.


VIDEO : तुम्ही देशद्रोही आहात का? पाकिस्तानातल्या वस्तू विकाल तर याद राखा - मनसे

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 19, 2019 09:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...