...त्यांचं काहीही नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं -नाना पाटेकर

...त्यांचं काहीही नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं -नाना पाटेकर

"जर अनधिकृतरित्या फेरीवाले बसले असेल तर त्यांना हुसकावून लावा"

  • Share this:

30 नोव्हेंबर : राज ठाकरेंचं काहीही नुकसान झालं नाही पण एक मत त्यांचं गेलं असं म्हणत अभिनेते नाना पाटेकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावलाय.

मनसेच्या फेरीवाल्या आंदोलनावर आक्षेप घेत नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांची बाजू घेतल्यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि अभिनेते नाना पाटेकर यांच्यात चांगलीच तूतू-मैंमैं झाली. ठाण्यात झालेल्या सभेत राज ठाकरे यांना नाना पाटेकर यांना फटकारलं होतं. मराठी सिनेमावर जेव्हा बंदी घातले जाते तेव्हा नाना का बोलत नाही असा प्रतिसवाल राज ठाकरे यांनी विचारला होता.

आज पुण्यात एनडीएची पासिंग आऊट परेड पार पडली. या परेडला नाना पाटेकर यांची खास उपस्थिती होती. या परेडनंतर नानांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

यावेळी राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला नाना पाटेकरांनी उत्तर दिलं.

देशात व्यक्ती स्वातंत्र्य आहे, बोलण्याचा अधिकार सर्वांना आहे.पण राज ठाकरेंचं काही नुकसान झालं नाही. मात्र त्याचं एक मत मात्र कमी झालं, असा टोला नानांनी लगावला.

तसंच फेरीवाल्यांसाठी एक जागा निश्चित करावी, जर अनधिकृतरित्या फेरीवाले बसले असेल तर त्यांना हुसकावून लावा असंही नाना पाटेकर म्हणाले.

पद्मावती सिनेमाबाबत धमक्या देणं चुकीचं आहे. चित्रपट पाहिल्याशिवाय प्रतिक्रिया देता येणार नाही असंही नानांनी स्पष्ट केलं. तसंच मला बाजीराव मस्तानी आवडला नव्हता. मी इतके सिनेमे काढले त्यात वाद नाही झाले असंही नाना म्हणाले.

एक वर्षे लष्करामध्ये ट्रेनिंग दिल्याशिवाय तरुणांना पदवी देऊ नये असं माझं आजही मत आहे असंही नाना पाटेकरांनी व्यक्त केलं.

First published: November 30, 2017, 11:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading