पुण्याची लेक आदिती पतंगेने जिंकला 'मिस इंडिया वॉशिंग्टन' किताब
पुण्याची लेक आदिती पतंगेने जिंकला 'मिस इंडिया वॉशिंग्टन' किताब
महाराष्ट्राच्या लेकीने भारताचा झेंडा साता समुद्रापार फडकवला आहे.मुळची पुण्याची (pune based aditi patange) असलेल्या आदितीने पतंगेने ‘मिस इंडिया वॉशिंग्टन (Miss India Washington) यूएसए 2021-22’ हा मानाचा किताब पटकावला आहे.
मुंबई, 19 जानेवारी- महाराष्ट्राच्या लेकीने भारताचा झेंडा साता समुद्रापार फडकवला आहे. महाराष्ट्रासाठी तर ही गोष्ट अभिमानास्पद आहे शिवाय देशासाठी देखील तितकीच महत्त्वाची आहे. मुळची पुण्याची (pune based aditi patange) असलेल्या आदितीने पतंगेने ‘मिस इंडिया वॉशिंग्टन (Miss India Washington Aditi Patange) यूएसए 2021-22’ हा मानाचा किताब पटकावला आहे.देशासाठी ही कौतुकस्पद गोष्ट आहे.
आदिती ही मायक्रोसॉफ्टमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यात सियाटल येथे ही स्पर्धा पार पडली. आदितीने बारवी पर्यंतचे शिक्षण मिलेनियम नॅशनल स्कूलमध्ये घेतेले. त्यानंतर ती उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेली, तिथे आदितीने कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही पदवी घेतली. यानंतर ती मायक्रोसॉफ्ट या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करू लागली.
आदितेने या स्पर्धेत ‘बेस्ट स्माईल’चा किताब पटकावला आहे. तिच्या इन्स्टावर तिचे काही सुंदर फोटो पाहायला मिळतात. या फोटोंमधील तिच्या चेहऱ्यावरील हास्य लक्षवेधून घेते. तिला लहानपणापासून अभिनया व मॉडेलिंगची आवड आहे. कोरोना काळात तिनं घरातून काम करून अम्पॉवरींग ऑर्गनायझेशनतर्फे आयोजित 'मिस इंडिया वॉशिंग्टन यूएसए 2021-22' स्पर्धेत भाग घेतला. यातील 22 स्पर्धकांमधून तिनं प्रथम क्रमांक मिळवला.
वाचा-क्यूटेस्ट कपल सिद्धार्थ चांदेकर- मिताली मयेकरचे संक्रांतीचे स्वीटेस्ट फोटो
ही एक स्टेट लेव्हल स्पर्धा होती. या स्पर्धेत सहभागी झालेले सर्व स्पर्धक वॉशिंग्टन स्टेट मधील होते. आता ती ऑगस्ट 20222 मध्ये नॅशनल लेव्हल 'मिस इंडिया युएसए' मध्ये वॉशिंग्टनची प्रतिनिधी म्हणून भाग घेणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.