मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

मनसेचा दणका, पुलवामा हल्ल्यानंतर T Series ने काढली पाकिस्तानी कलाकारांची गाणी

मनसेचा दणका, पुलवामा हल्ल्यानंतर T Series ने काढली पाकिस्तानी कलाकारांची गाणी

टी-सीरिज, सोनी म्युझिक, व्हिनस, टीप्ससारख्या कंपन्यांसोबत चर्चा केली आणि त्यांना पाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्यास सांगितलं.

टी-सीरिज, सोनी म्युझिक, व्हिनस, टीप्ससारख्या कंपन्यांसोबत चर्चा केली आणि त्यांना पाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्यास सांगितलं.

टी-सीरिज, सोनी म्युझिक, व्हिनस, टीप्ससारख्या कंपन्यांसोबत चर्चा केली आणि त्यांना पाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्यास सांगितलं.

मुंबई, १८ फेब्रुवारी २०१९- Atif Aslam and Rahat Fateh Ali khan's songs removed from T Series YouTube Channel पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर टी-सीरीजने आपल्या यूट्यूब चॅनलवरून पाकिस्तानी कलाकारांना काढून टाकलं आहे. म्हणजे टी-सीरीजच्या यूट्यूब चॅनलने राहत फतेह अली खान आणि आतिफ असलम या दोन पाकिस्तानी गायकांची सर्व गाणी काढून टाकली आहेत. काही दिवसांपूर्वी टी-सीरीजने या दोन्ही गायकांसोबत काम केलं होतं.

व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी प्रदर्शित झालेलं बारिशें गाणं आता यूट्यूबवर दिसणार नाही. टी-सीरीजने हे पाऊल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या धमकीनंतर उचललं. एमएनएस चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले की, ‘आम्ही टी-सीरिज, सोनी म्युझिक, व्हिनस, टीप्ससारख्या कंपन्यांसोबत चर्चा केली आणि त्यांना पाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्यास सांगितलं. कंपन्यांनी लगेच यावर कृती केली तर ठीक अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीने पावलं उचलावी लागतील.’

दरम्यान, दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्याचा विरोध करताना शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी पाकिस्तानचा त्यांचा दौरा रद्द केला. याआधी २०१६ मध्ये दहशतवाद्यांनी उरीवर हल्ला केला होता. या हल्ल्याचा निषेध म्हणून भारताने पाकिस्तानी कलाकारांवर बॉलिवूडमध्ये काम करण्यावर बंदी घातली होती. यावेळी फवाद खान (ऐ दिल है मुश्किल), माहिरा खान (रईस) यांच्यावरून अनेक वाद झाले होते. या दोन्ही कलाकारांना सिनेमाचं प्रमोशन अर्धवट सोडून मायदेशात परतावे लागले होते.

दरम्यान, जम्मू- काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात ४० भारतीय सीआरपीएफच्या जवानांना वीरमरण आलं. या दहशतवादी हल्ल्यामुळे सर्वसामान्य नागरिकापासून ते बॉलिवूड सेलिब्रिटीपर्यंत सर्वांमध्येच पाकिस्तानविरुद्ध चीड निर्माण झाली आहे. या सगळ्यात अजय देवगणने एक मोठा निर्णय घेतला. अजयने ट्विट करत त्याचा आगामी 'टोटल धमाल' हा सिनेमा पाकिस्तानमध्ये प्रदर्शित न करण्याचा निर्णय त्याने घेतला असल्याचे स्पष्ट केले. अजयने ट्विटमध्ये लिहिले की, ‘पुलवामा हल्ल्यानंतर सध्याचं वातावरण पाहता टोटल धमालच्या टीमने हा सिनेमा पाकिस्तानात प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे.’

Pulwama Encounter: भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना घेरले, ग्राऊंडवरून पहिला VIDEO

First published:

Tags: Atif aslam, Jammu kashmir, Pulwama attack, Pulwama terror attack, Rahat fateh ali khan, Terror attack