मुंबई, 16 फेब्रुवारी : पुलवामा इथे दहशतवादी हल्ल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी जे वक्तव्य केलं, त्याचा सगळीकडून निषेध होतोय. कपिल शर्मा शोमध्ये सिद्धूची मोठी भूमिका असते. तो शो एकतर बंद करावा किंवा त्यातून सिद्धू यांना काढून टाकावं अशी प्रेक्षक जोरदार मागणी करतायत.
पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यावर नवज्योत सिंग सिद्धूनं प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते, घडलेल्या घटनेचा मी निषेध करतो. पण काही मूठभर लोकांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल अख्ख्या देशाला कसं जबाबदार धरता येईल? अशा प्रकारे त्यांनी पाकिस्तानचा बचावच केला होता. यावर सिद्धू यांच्यावर प्रचंड टीका होतेय. प्रेक्षकांचा रोष त्यांनी ओढून घेतलाय.
सिद्धू यांनी दहशतवाद्यांना शिक्षा व्हायलाच हवी, असंही म्हटलं होतं. ते पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या शपथविधीलाही गेले होते. त्यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी नापसंती दर्शवली होती. जेव्हा सिद्धू आणि पाकिस्तानचे सेना प्रमुख यांनी एकमेकांना आलिंगन दिलेला फोटोही ट्रोल झाला होता.
आता प्रेक्षक सिद्धूला कपिल शर्माच्या शोमधून काढून टाकावं, नाही तर आम्ही शोवर बंदी घालू अशी मागणी करतायत. सध्या #Boycotthe kapil Sharma show हा हॅशटॅग ट्रेंड होतोय.
#Sold_Traitor#Siddhu Speaking the language of Separatists.@AskAnshul @rishibagree pic.twitter.com/CFJ0MXGTAs
— chandan kumar (@krchandan20) 15 February 2019
Throw Out Sidhu From The Kapil Sharma Show Or Els We #Boycott The Kapil Sharma Show..!!@SonyTV @KapilSharmaK9
— Soumya Roy (@SamRoy_) 15 February 2019
अजून सोनी टीव्ही किंवा कपिल शर्माकडून काही प्रतिक्रिया मिळालेली नाहीय. पण हा शो धोक्यात आलाय.
पुलवामा येथील अवंतीपोरा येथील गोरीपोरा सीआरपीएफच्या ताफ्यावर IEDद्वारे हल्ला केला. हल्लाजैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.या घटनेनंतर पुलवामा येथे असलेल्या सर्व जवानांना, राज्य पोलीस दल आणि सीआरपीएफच्या अन्य तुकड्यांना अवंतिपोरा येथे पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला. तसेच परिसरात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. राज्यातील पुलवामा, शोपियां, कुलग्राम आणि श्रीनगर जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. काश्मीरमधील हा गेल्या तीस वर्षांतला सर्वात मोठा मानला जात आहे.
बाॅलिवूडच्या महानायकानं इंडस्ट्रीत पूर्ण केली 50 वर्ष, अभिषेक-श्वेतानं लिहिली इमोशनल पोस्ट