Reality Check-खरंच पुलवामा हल्ल्यादरम्यान शाहरुख खानने पाकिस्तानला दिले 45 कोटी रुपये?

Reality Check-खरंच पुलवामा हल्ल्यादरम्यान शाहरुख खानने पाकिस्तानला दिले 45 कोटी रुपये?

शाहरुख खानने पाकिस्तानातील गॅस ट्रॅजिडी पीडितांसाठी ४५ कोटी रुपये दान केले. या संदर्भातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, २० फेब्रुवारी २०१९- पुलवामा दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांच्या घरच्यांना अनेक बॉलिवूड कलाकारांनी आर्थिक मदत केली. एकीकडे यात अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सलमान खान आणि कैलाश खेर यांसारख्या सुपरस्टार्सनी शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली. तर दुसरीकडे शाहरुख खानबद्दल सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका बातमीमुळे अनेकांना धक्का बसला आहे.

व्हायरल होणाऱ्या बातमीनुसार, शाहरुख खानने पाकिस्तानातील गॅस ट्रॅजिडी पीडितांसाठी ४५ कोटी रुपये दान केले. या संदर्भातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. शाहरूखच्या नावाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही बातमी व्हायरल झाल्याचे समजताच शाहरुखचे चाहते त्याच्यासाठी उभे राहिले. किंग खानच्याविरुद्ध बोलणाऱ्यांच्या विरोधात तर त्यांनी मोहीमच सुरू केली.

शाहरुखचे चाहते म्हणाले की, बॉलिवूडच्या बादशहाने भारताची मान जगभरात उंचावली आहे. त्यांनी StopFakeNewsAgainstSRK या हॅशटॅगने शाहरुखला समर्थन द्यायला सुरुवातही केली होती. याच संदर्भातले हे काही ट्वीट पाहा... एका युझरने लिहिले की, शाहरुख जेव्हाही दान धर्म करतो तो कोणाला कळू देत नाही.

या प्रकरणी शाहिद, सिटीलाइट्ससारख्या सिनेमाचं दिग्दर्शन केलेल्या हंसल मेहतांनीही शाहरुख खानला पाठिंबा दिला. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शाहरुखचं समर्थन केलं. तसेच शाहरुखविरुद्धच्या बातम्या न पसरवण्याचं आवाहन त्यांनी केलं.

शाहरुख खानविरुद्ध खोट्या बातम्या पसरण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही त्याच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. वेगवेगळ्या लोकांनी, नेत्यांनी आणि संघटनांनी त्याच्या धर्मावर आणि त्याच्या देशप्रेमावर प्रश्न उपस्थित केले होते.

SPECIAL REPORT : 'शरण या, अन्यथा मरणाला तयार राहा'

First published: February 20, 2019, 1:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading