Pulwama Attack- या अभिनेत्यांनी शहिदांच्या आयुष्यावर लिहिली भावुक कविता, तुम्हीही विसरणार नाहीत जवानांचं बलिदान

एकीकडे भारतीय नागरिक शहिदांसाठी दुःख व्यक्त करत आहेत तर दुसरीकडे दहशतवाद्यांना कठोरात कठोर शिक्षा सरकारने द्यावी अशी मागणीही ते करत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Feb 18, 2019 11:31 AM IST

Pulwama Attack- या अभिनेत्यांनी शहिदांच्या आयुष्यावर लिहिली भावुक कविता, तुम्हीही विसरणार नाहीत जवानांचं बलिदान

पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण देशात शोकाकुल वातावरण आहे. एकीकडे भारतीय नागरिक शहिदांसाठी दुःख व्यक्त करत आहेत तर दुसरीकडे दहशतवाद्यांना कठोरात कठोर शिक्षा सरकारने द्यावी अशी मागणीही ते करत आहेत. यात अभिनेते अनुपम खेर आणि आयुष्मान खुराना यांनी शहिदांसाठी हृदयस्पर्शी कविता सोशल मीडियावर शेअर केल्या. या कविता वाचून सैनिक आपल्यासाठी किती बलिदान देतात याची जाणीव प्रत्येक नागरिकाला होईल.

देश का हर जवान बहुत खास है,

है लड़ता जब तक श्वास है,

परिवारों के सुखों का कारावास है,

शहीदों की माओं का अनंत उपवास है,

Loading...

उनके बच्चों को कहते सुना है

पापा अभी भी हमारे पास हैं
तर, अनुपम खेर यांनी लिहिले की, ‘मला मेसेजवर एक कविता आली होती. या कवितेत जवानाच्या आयुष्याची तुलना सामान्य व्यक्तीच्या आयुष्याशी केली आहे. ही कविता वाचून मी फार भावुक झालो.’ अनुपम यांनी म्हटलेल्या इंग्रजी कवितेचं भाषांतर मराठीत खालीलप्रमाणे आहे...‘तुम्ही डिग्रीसाठी तयारी केली आणि मी सगळ्यात कठीण ट्रेनिंग केलं. तुमचा दिवस सकाळी ७ वाजता सुरू होतो आणि ५ वाजता संपतो. माझा दिवस सकाळी ४ वाजता सुरू होतो आणि रात्री ९ वाजता संपतो. कधी कधी यात काही रात्रींचाही समावेश असतो. तुमचं स्वतःचं कॉनव्होकेशन सेरेमनी असते आणि मला माझ्या पीओपीमध्ये सहभाग घ्यायचा असतो. तुम्हाला सर्वोत्तम कंपनी चांगल्या पगाराची नोकरी देते. मला माझी पलटन मिळाली आणि खांद्यावर २ स्टार लावण्यात आले.’अनुपम पुढे म्हणाले की, ‘तुम्हाला नोकरी मिळाली आणि मला आयुष्य जगण्याचा मार्ग... दररोज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबाला भेटता आणि मी दररोज प्रार्थना करतो की लवकरच मीही माझ्या कुटुंबाला भेटेन. तुम्ही संगीत आणि प्रकाशाच्या तेजात उत्सव साजरे करतात आणि मी माझ्या सहकाऱ्यांसोबत बंकरमध्ये बसून असतो. लग्न आपण दोघांनीही केलं... तुझी पत्नी तुला दररोज पाहते आणि माझी पत्नी मी सुखरूप रहावं म्हणून दररोज प्रार्थना करते.’पुढे कविता वाचताना अनुपम म्हणाले की, ‘तुला बिझनेस ट्रीपवर पाठवलं जातं, मी लाइन ऑफ कंट्रोलवर उभा राहतो. आपण दोघंही परततो... दोघांच्याही पत्नींचे अश्रू थांबत नाहीत. पण तू तिला कवेत घेतोस.. तिचे अश्रू पुसतोस... पण मी तसं करू शकत नाही.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2019 10:19 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...