या बॉलिवूड अभिनेत्याने ‘जंगला’त केलं न्यूड फोटोशूट, ज्वाला गुट्टाने बंद केले डोळे

बॉलिवूडकरांकडून त्याच्या या फोटोचं कौतुक होत आहे तर दुसरीकडे चाहत्यांनी मात्र त्याला चांगलंच फैलावर घेतलं.

News18 Lokmat | Updated On: Aug 4, 2019 04:07 PM IST

या बॉलिवूड अभिनेत्याने ‘जंगला’त केलं न्यूड फोटोशूट, ज्वाला गुट्टाने बंद केले डोळे

मुंबई, 04 ऑगस्ट- अभिनेता पुलकित सम्राटने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक न्यूड फोटो शेअर केला आहे. त्याने हा फोटो शेअर करत 'हॅलो फ्रायडे' असं कॅप्शनही दिलं आहे. 'फुकरे' सिनेमातील त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री रिचा चड्ढाने 'रियली नंगू' अशी कमेंट या फोटोवर केली तर बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने डोळे बंद करणारे इमोजी या फोटोवर टाकले. तर अभिनेता विष्णू विशालने 'जंगल में नंगल' अशी कमेंट केली. 'सनम रे' फेम अभिनेत्याने न्यूड फोटोशूट शेअर केल्यानंतर त्यावर अनेकांनी नानाविध कमेंट केल्या. विशेष म्हणजे अनेक बॉलिवूडकरांनी या फोटोवर कमेंट केल्या.

असं म्हटलं जातं की पुलकितने खास उद्देशाने हे फोटोशूट केलं आहे. आता त्याचा नक्की उद्देश कोणता आहे हे अजून कळलेलं नाही. सध्या पुलकितचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. गायक राघव सचनरे या फोटोवर 'ओए' अशी कमेंट केली तर रनिल अब्राहमने त्याला 'सर्व काही ठीक आहे ना' असा प्रश्न विचारला. एकीकडे बॉलिवूडकरांकडून त्याच्या या फोटोचं कौतुक होत आहे तर दुसरीकडे चाहत्यांनी मात्र त्याला चांगलंच फैलावर घेतलं. तुला काही लाज नाही का असा प्रश्नही अनेकांनी कमेंटमध्ये विचारला.

 

Loading...

View this post on Instagram

 

Hello Friday! 😈

A post shared by Pulkit Samrat (@pulkitsamrat) on

पुलकीत सध्या जिममध्ये फार घाम गाळत आहे. तो अनेकदा सोशल मीडियावर त्याचे शर्टलेस फोटो शेअर करत असतो. सलमान खानच्या मानलेल्या बहिणीशी पुलकीतचं लग्न झालं होतं. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. अवघ्या काही महिन्यांतच दोघांनी घटस्फोट घेतला. सुरुवातीला सलमानकडे पाहून पुलकित जिमला जातो असं सर्वांना वाटत होतं. मात्र यात काही तथ्य नसल्याचं नंतर कळलं. सध्या पुलकीत त्याच्या आगामी तैश सिनेमाच्याच चित्रीकरणात व्यग्र आहे. याशिवाय त्याचा फुकरे सिनेमाही पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. असं असलं तरी सध्या पुलकीत सम्राट फक्त त्याच्या न्यूड फोटोमुळे चर्चेत आला आहे हे मात्र नक्की.

मुसळधार पावसामुळे सुबोध भावेचा 3 तास स्टेशनवर खोळंबा, नागरिकांना केलं 'हे' आवाहन

मानसिक आजाराने त्रस्त गोविंदा? जवळच्या मित्राने केला खुलासा

पावसाचा फटका मालिकांनाही, रात्रीस खेळ चाले मालिकेचं चित्रीकरण थांबलं

VIDEO: मालाडमध्ये घरात गुडघ्याभर पाणी, नागरिकांचे हाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 4, 2019 04:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...