एडिनबर्ग फिल्म फेस्टिवलमध्ये अभिनेत्री पूजा सावंत सर्वोत्कृष्ट

एडिनबर्ग फिल्म फेस्टिवलमध्ये अभिनेत्री पूजा सावंत सर्वोत्कृष्ट

नुकत्याच पार पडलेल्या 'एडिनबर्ग फिल्म फेस्टिव्हल'मध्ये तिला तिच्या 'लपाछपी' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालाय.

  • Share this:

30 नोव्हेंबर : अभिनेत्री पूजा सावंतने आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक खास पुरस्कार आपल्या नावावर केलाय.नुकत्याच पार पडलेल्या 'एडिनबर्ग फिल्म फेस्टिव्हल'मध्ये तिला तिच्या 'लपाछपी' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालाय. तर ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांनाही या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालाय.

'लपाछपी'या हॉरर सिनेमात पूजाने एका गरोदर स्त्रीची भूमिका केली होती. ही भूमिका साकारणं माझ्यासाठी आव्हानात्मक होतं असं पूजाचं म्हणणं आहे. पूजाच्या अभिनयाला अांतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेली ही दाद तिला सुखावून गेलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 30, 2017 05:32 PM IST

ताज्या बातम्या