‘साहो’च्या कलेक्शनचा मार्ग कठीण, एकाच दिवशी रिलीज होणार 'हे' तीन बिग बजेट सिनेमे

‘साहो’च्या कलेक्शनचा मार्ग कठीण, एकाच दिवशी रिलीज होणार 'हे' तीन बिग बजेट सिनेमे

‘साहो’चा मार्ग काहीसा कठीण असणार आहे. कारण याच दिवशी बॉलिवूडमधील आणखी दोन ब्लॉकबास्टर सिनेमा रिलीज होणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 6 जुलै : बॉलिवूडमध्ये एकाचवेळी दोन किंवा त्याहून अधिक सिनेमा रिलीज होण्याची गोष्ट नवी नाही. पण जर हेच बॉलिवूडच्या तीन मोठ्या स्टार्सच्या बाबतीत घडलं तर मात्र बॉक्स ऑफिसवर बराच गोंधळ उडतो. यंदा 15 ऑगस्टला काहीसं असंच चित्र पाहायला मिळणार आहे. साउथ सुपरस्टार प्रभासनं ‘बाहुबली’ सिनेमामुळे बॉलिवूडमध्येही आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यानंतर आता तो ‘साहो’च्या माध्यमातून पुन्हा एकदा येत्या 15 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र यावेळी ‘साहो’चा मार्ग काहीसा कठीण असणार आहे. कारण याच दिवशी बॉलिवूडमधील आणखी दोन ब्लॉकबास्टर सिनेमा रिलीज होणार आहेत. त्यामुळे या सिनेमासाठी कलेक्शनचा मार्ग काहीसा कठीण असणार आहे.

प्रभासचा बहुचर्चित सिनेमा ‘साहो’ येत्या 15 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातील गाणं ‘सैय्यां सायको’ चा टीझर रिलीज झाला असून या गाण्याला प्रेश्रकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र या सिनेमाच्या कलेक्शनचा मार्ग मात्र काहीसा कठीण आहे. कारण याच दिवशी अक्षय कुमारचा मिशन मंगल आणि जॉन अब्राहमचा बाटला हाऊस असे दोन बिग बजेट आणि सुपर स्टारर सिनेमा रिलीज होत आहेत.

'यात तर 20 लोकांचे कपडे होतील', कॉमेडियनने उडवली निया शर्माच्या ड्रेसची थट्टा

अक्षय कुमार, तापसी पन्नू, विद्या बालन अशी तगडी स्टार कास्ट असलेला ‘मिशान मंगल’ हा सिनेमा सुद्धा यंदा 15 ऑगस्टला रिलीज होत आहे. या सिनेमाचं पोस्टर अभिनेत्री तापसी पन्नूनं तिच्या इनस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलं आहे. तसेच अक्षयने सुद्धा त्याच्या सोशल मीडिया अकउंटवर हे पोस्टर शेअर केलं आहे.

परिणितीनं असं पूर्ण केलं Bottlecapchallenge, हा व्हिडिओ एकदा पाहाच

हा सिनेमा भारताच्या मंगळ ग्रह अभियानावर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे. यात अक्षय कुमार एका वैज्ञानिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. बऱ्याच काळापासून या सिनेमाची बॉलिवूडमध्ये खूप चर्चा आहे. कारण भारताच्या मंगळ अभियानावर तयार होत असलेला हा पहिलाच सिनेमा आहे.

वाढदिवसाच्या निमित्तानं रणवीरकडून चाहत्यांना मिळालं ‘हे’ खास गिफ्ट

एकीकडे मिशन मंगल तर दुसरीकडे अभिनेता जॉन अब्राहमचा ‘बाटला हाऊस’ हा सिनेमा सुद्धा 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. हा सिनेमा 2008च्या एका वादग्रस्त एनकाउंटरवर आधारित आहे. या सिनेमाचं पोस्टर जॉननं मागील वर्षीच शेअर केलं होतं. या सिनेमाचं दिग्दर्शन निखिल अडवाणी करत असून या सिनेमात जॉन एका पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. ज्याचं नाव संजीव कुमार यादव आहे. त्यामुळे हे तिन्ही सिनेमे एकाच दिवशी रिलीज झाले तर बॉक्स ऑफिसवर कलेक्शनच्या बाबतीत कोणता सिनेमा बाजी मारतो हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

========================================================

SPECIAL REPORT: सोशल मीडियावर व्हायरल होणारं बॉटल कॅप चॅलेज काय आहे?

First published: July 6, 2019, 4:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading