मुंबई, 10 सप्टेंबर : सध्या ऐश्वर्या राय बच्चन सातव्या आसमानात आहे. आणि घडलंयही असंच. वाॅशिंग्टन डीसीमध्ये बच्चन कुटुंब सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहे. कारण ऐश्वर्यानं प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावलाय.
मेरिल स्ट्रीप या पुरस्कारानं ऐश्वर्याचा सन्मान करण्यात आला. त्याबद्दल ऐश्वर्याचा पती अभिषेक बच्चननं ट्विट करून बायकोचं कौतुक केलंय. तो म्हणतो, ' बायकोचा सन्मान झाला. आमच्या लेकीनं तिला आलिंगन दिलं. आणि तिचा अभिमान असलेला मी त्यांचा फोटो काढतोय.'
ऐश्वर्याच्या या सोहळ्याला तिची आईही उपस्थित होती. टीव्ही आणि सिनेमा यातल्या यशस्वी कामाबद्दल हा पुरस्कार दिला जातो. अभिषेक नेहमीच आपल्या बायकोचं कौतुक करत असतो.
And the Mrs. is awarded the Meryl Streep award for excellence at WIFT. The little one gives her a congratulatory hug, and I look on (to the photo) a very proud husband! pic.twitter.com/tmaICHSa1N
— Abhishek Bachchan (@juniorbachchan) 9 September 2018
फॅनी खान सिनेमाच्या वेळीही अभिषेकनं ऐश्वर्याच्या भूमिकेचं कौतुक केलं होतं. ऐश्वर्या राय बच्चन, अनिल कपूर आणि राजकुमार राव यांची मुख्य भूमिका असलेला फॅनी खान. अभिषेकने आपल्या बायकोचा हा सिनेमा वेळात वेळ काढून पाहिला.
अभिषेकला हा सिनेमा एवढा आवडला की त्याने सिनेमाचे भरभरून कौतुक केले. माजी विश्वसुंदरी ऐश्वर्याच्या चाहत्यांच्या संख्येत काही कमतरता नाही. कोट्यवधी लोकांच्या हृदयाची ताईत असलेल्या अॅशच्या चाहत्यांमध्ये आता एकाची भर पडली आहे. तो म्हणजे तिचा नवरा अभिषेक.
अभिषेकचा खूप दिवसांनी एक सिनेमा येतोय आणि त्याचा ट्रेलर रिलीज झाला. अनुराग कश्यपचं दिग्दर्शन, तापसी पन्नू, विकी कौशलचा माईण्डब्लोईंग अभिनय. अजून काय हवं? ट्रेलर पाहूनच सिनेमा वेगळ्या धाटणीचा असल्याचा अंदाज येतोय.
ट्रेलरमध्ये बिनधास्त अंदाज दिसतोय. सिनेमाच्या कथेचाही अंदाज येतोय. तापसी आणि विकी एकमेकांच्या प्रेमात आहेत. पण विकी लग्नाची जबाबदारी घ्यायची वेळ येताच मागे होतो. मग तापसी अभिषेकशी लग्न करायचं ठरवते.
जान्हवी कपूर बनली वाॅशिंग्टनची 'धडक'न!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.