मिका सिंगच्या घराबाहेर निदर्शन, वाढवण्यात आली सुरक्षा

मिका सिंगच्या घराबाहेर निदर्शन, वाढवण्यात आली सुरक्षा

गो बॅक पाकिस्तान पाकिस्तानचे पोस्टर घेऊन लोकांनी त्याच्या घराबाहेर निदर्शन केलं.

  • Share this:

मुंबई, 20ऑगस्ट- बॉलिवूड गायक मिका सिंगच्या (Mika Singh) घराबाहेर सोमवारी निदर्शन (Protest) करण्यात आलं. यानंतर मिकाच्या घराच्या बाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मिकाची मैत्रीण आणि वकील फाल्गुनी ब्रह्म भट्टने सांगितले की, त्याच्या घराबाहेर ज्या संस्थेने निदर्शन केले ती संस्था बनावट होती. ही ती संस्था नव्हती ज्यांनी मिकाच्या पाकिस्तानातील गाण्याविरोधात निदर्शन करण्याची घोषणा केली होती. फाल्गुनी म्हणाली की, 'एक बनावट संस्था त्याच्या घरासमोर आंदोलन करत होती. ते सर्व मिकाला धमकावण्याचा प्रयत्न करत होते.'

मिकाकडून पैसे घेण्याच्या विचारात आहे ती संस्था

वकील फाल्गुनीच्या मते, 'ती खोटी संस्था मिकाकडून पैसे घेण्याच्या विचारात आहे. याउलट FWICE ने मिकाचं समर्थन करत मीटिंग बोलावली आहे. लवकरच या मिकासोबत मीटिंग करून प्रकरण सोडवलं जाईल.' असं असलं तरी मिकाच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात निदर्शन करण्यात आलं. गो बॅक पाकिस्तान पाकिस्तानचे पोस्टर घेऊन लोकांनी त्याच्या घराबाहेर निदर्शन केलं. एएनआय या वृत्तसंस्थेने याबद्दल ट्वीट करत माहिती दिली.

मिका सिंगच्या घराची सुरक्षा वाढवली

सध्या मिका मुंबईच्या बाहेर आहे. त्याच्या मैत्रिणीकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्याला सतत धमक्या येत आहे. फाल्गुनी म्हणाली की, त्याच्या घराबाहेरचं निदर्शन पाहता प्रशासनाने त्याच्या घराला अतिरिक्त पोलीस सुरक्षा दिली.

मिका सिंगने शेअर केला होता बीएन तिवारीचा व्हिडीओ

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइचे (FWICE) बीएम तिवारी यांचा एक व्हिडीओ मिकाने शेअर केला होता. यात तिवारी यांनी फेडरेशन मिकाशी या संबंधी बातचीत करेल असं म्हटलं होतं. तसेच बोलणी झाल्यानंतर मिकाला बॅन करायचं की नाही याचा निर्णय घेण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं.

Man vs Wild मध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला रेकॉर्ड

...अखेर त्या अफेअरबद्दल बोलला केएल राहुल

इंटरनेटवर लीक झालेत या अभिनेत्याचे सेक्स सीन

अखेर करण जोहरने सांगितलं त्या Drugs Party चं सत्य

ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचं निधन

Published by: Madhura Nerurkar
First published: August 20, 2019, 1:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading