मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

लखनऊमध्ये प्रियांका चोप्राचा निषेध, पोस्टर लावून विरोधक म्हणाले...

लखनऊमध्ये प्रियांका चोप्राचा निषेध, पोस्टर लावून विरोधक म्हणाले...

प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्रा

: बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. प्रियांका चोप्रा तीन वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर भारतात आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 8 नोव्हेंबर : बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. प्रियांका चोप्रा तीन वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर भारतात आली आहे. प्रियांका तिच्या भारत दौऱ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सतत शेअर करत असते. प्रियांका तिच्या हेअर प्रोडक्ट अनोमलीच्या प्रमोशनसाठी मुंबईत आली आहे. पण मुंबईनंतर आता प्रियांका चोप्रा लखनऊमध्ये आहे. मात्र लखनऊमध्ये प्रियांकाला विरोध होताना दिसून आला. काय आहे हा नक्की विषय? जाणून घेऊया.

उत्तर प्रदेशातील मुलींवरील हिंसा आणि भेदभाव संपवण्यासाठी युनिसेफ कार्यक्रमाचा एक भाग म्हणून प्रियांका चोप्रा दोन दिवसांच्या लखनऊ दौऱ्यावर आहे. गोमतीनगर येथील संतमूलक चौकाजवळ अभिनेत्रीच्या विरोधात पोस्टर लावण्यात आले होते. या पोस्टवर लिहिलंय 'यू आर नॉट वेलकम सिटी ऑफ नवाब'. असे पोस्टर्स कोणी लावली याचा तपास गोमतीनगर पोलिस करत आहेत. अद्याप कोणाचे नाव समोर आले नाही.

हेही वाचा -  सारानंतर हृतिक रोशनच्या बहिणीला डेट करतोय कार्तिक आर्यन, कोण आहे ती?

गोमतीनगरमध्ये प्रियांकाच्या बहिष्काराचे पोस्टर लावण्यात आले आहेत. यावरून प्रियांका लखनऊला आल्याने काही लोक खूश नसल्याचे स्पष्ट झाले दिसत आहे. प्रियांका चोप्रा 2 दिवस लखनऊमध्ये उपस्थित आहे, या दरम्यान ती युनिसेफच्या वतीने अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहे. सोमवारी तिनं प्राथमिक शाळेतील उपक्रमात सहभागी होऊन मीना मंचासोबत अंगणवाडी केंद्रात होणाऱ्या उपक्रमांचे निरीक्षण केले. आता मंगळवारी अभिनेत्री लोकबंधू हॉस्पिटलमध्ये जाणार असून वन स्टॉप सेंटर 181 महिला हेल्पलाइनवर जाणार आहे. याशिवाय ती गोमतीनगर येथील युनिसेफ कार्यालयासह न्यू बॉर्न केअर युनिट आणि महिला रुग्णालयात हजेरी लावणार आहे.

दरम्यान, प्रियांका तिच्या आगामी 'जी ले जरा' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा महिलांवर आधारित चित्रपट 2011 मध्ये आलेल्या 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या चित्रपटाचा सिक्वेल असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे तिला पुन्हा एकदा बॉलिवूडमधे पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.

First published:

Tags: Bollywood, Bollywood News, Entertainment, Hollywood, Priyanka chopra