मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Gandhi Godse Ek Yudh: गांधी गोडसे सिनेमा वादात? मुंबईतील प्रेस कॉन्फरन्स बंद पाडली

Gandhi Godse Ek Yudh: गांधी गोडसे सिनेमा वादात? मुंबईतील प्रेस कॉन्फरन्स बंद पाडली

protest against Gandhi Godse Ek Yudh

protest against Gandhi Godse Ek Yudh

एकीकडे प्रेक्षकांनी सिनेमासाठी उत्सुकता दाखवली आहे. तर दुसरीकडे सिनेमाला विरोध दर्शवण्यात येत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई,  20 जानेवारी:  येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी गांधी गोडसे एक युद्ध हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. अभिनेते दीपक अंतानी आणि मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर सिनेमा प्रमुख भूमिकेत आहे. सिनेमाच्या ट्रेलरनंतर सिनेमाची उत्सुकता वाढली आहे. एकीकडे प्रेक्षकांनी सिनेमासाठी उत्सुकता दाखवली आहे. तर दुसरीकडे सिनेमाला विरोध दर्शवण्यात येत आहे. कलाकर सिनेमाचं प्रमोशन करत आहेत. प्रमोशनसाठी सिनेमाची टीम मुंबईत आली. सिनेमाची प्रेस कॉन्फरन्स सुरू असताना काही लोकांनी सिनेमाला विरोध दर्शवला आहे. गांधी गोडसे सिनेमा विरोधात निदर्शन केलं. याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत विरोधकांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी सिनेमाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी, अभिनेते दीपक अंतानी आणि असोसिएट प्रोड्यूसर ललित श्याम टेकचंदानी उपस्थित होते.

गांधी गोडसे सिनेमाच्या  निर्मात्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेत  सिनेमाचे काही संवाद आणि सीन्, मीडियासमोर दाखवण्यासाठी क्रायक्रम घेतला. सीन्स सुरू होताच काही निदर्शकांनी गोंधळ घातला.  कार्यक्रमादरम्यान आंदोलकांनी सिनेमा विरोधात घोषणाबाजी केली. महात्मा गांधीची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेंचासिनेमात गौरव करण्यात आला असा आरोप दिग्दर्शकांवर करण्यात आलाय. महात्मा गांधीच्या योगदानाला सिनेमात कमी महत्त्व देण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय त्यामुळे सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

हेही वाचा - Gandhi Godse – Ek Yudh Trailer Out: गांधी गोडसे ट्रेलर रिलीज; चिन्मय मांडलेकरांचे दमदार डॉयलॉग एकदा ऐकाच

" isDesktop="true" id="817770" >

सिनेमाला झालेल्या या निषेधाबद्दल सिनेमाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी म्हटलं आहे की,  आम्ही महात्मा गांधी यांना कमी लेखण्याचा आणि नथुराम गोडसे यांना कमी लेखण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही. लोकांनी आधी सिनेमा पाहावा. त्यानंतर त्यांना समजेल की आम्ही सिनेमातून कोणता संदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही सिनेमातील दोन्ही पात्रांना समान महत्त्व देण्याचा प्रयत्न केला आहे.

गांधी गोडसे एक युद्ध हा सिनेमा 26जानेवारी प्रदर्शित होईल.सिनेमातून गांधी आणि गोडसे यांच्यातील वैचारिक युद्ध दाखवण्यात येणार आहे. या सिनेमाच्या निमित्तानं दिग्दर्शक राजकुमारी संतोषी हे जवळपास 9वर्षांनी कमबॅक करत आहेत. सिनेमाला ए.आर. रहमान यांचं संगीत लाभलं आहे.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News