Home /News /entertainment /

'कबीर सिंग २' अन् 'भुलभुलैया ३' येणार प्रेक्षकांच्या भेटीला? निर्मात्यांनी केला खुलासा

'कबीर सिंग २' अन् 'भुलभुलैया ३' येणार प्रेक्षकांच्या भेटीला? निर्मात्यांनी केला खुलासा

'कबीर सिंग २' अन् 'भुलभुलैया ३' येणार प्रेक्षकांच्या भेटीला? निर्मात्यांनी केला खुलासा

'कबीर सिंग २' अन् 'भुलभुलैया ३' येणार प्रेक्षकांच्या भेटीला? निर्मात्यांनी केला खुलासा

एकीकडे 'भुलभुलैया 2' (Bhool Bhuliyaa2) हा सिनेमात सिनेमागृहात धुमाकूळ घालतोय तर दुसरीकडे शाहीदच्या (Shahid Kapoor) 'कबीर सिंह'( Kabir Singh) सिनेमाचा हँगओव्हर अजूनही प्रेक्षकांवर आहे. दोन्ही सिनेमांचे पुढचे पार्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार या विषयी सिनेमांच्या निर्मात्यांनी मोठा खुलासा केला आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 27 मे:  अभिनेता शाहिद कपूरचा (Shahid Kapoor)  जबरदस्त हिट सिनेमा म्हणजे 'कबीर सिंह' (Kabir Singh) त्याच्या आतापर्यंतच्या सिनेमात कबीर सिंह हा सिनेमा सुपरहिट ठरला. 2019मध्ये सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सिनेमात शाहीदसोबत अभिनेत्री कियरा अडवाणी (kiara Advani) प्रमुखी भूमिकेत होती. दोघांची जोडी प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस पडली. सिनेमालाही प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं. सिनेमाला 3 वर्ष झाल्यानंतरही आजही सिनेमाची  आणि गाण्यांची क्रेझ कायम आहे.  तर दुसरीकडे 'भुलभुलैया 2'  (Bhool Bhulaiyaa2)  हा सिनेमा देखील सिनेमागृहात धुमाकूळ घातलो आहे. कंगनाच्या (Kangana Ranaut) 'धाकड'ला (Dhaakad)  टक्कर देत भुलभुलैया 2 ने तगडी कमाई केली.  दोन्ही सिनेमांविषयी प्रेक्षकांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कबीर सिनेमाचा दुसरा पार्ट (Kabir Singh 2)  आणि भुलभुलैया सिनेमाचा तिसरा पार्ट (Bhool Bhulaiyaa 3)  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाच्या निर्मात्यांनी याविषयी महत्त्वाचा खुलासा केला आहे. मुराद खेतानी आणि भूषण कुमार यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे.  दोघेही सध्या सिनेमाच्या सिक्वलवर चर्चा करत आहेत. तर दुसरीकडे याच दोघांची निर्मिती असलेला भुलभुलैया 2 हा सिनेमा 20 मे प्रदर्शित झाला आहे. ज्यात कार्तिक आर्यन (Kartik Aryan) आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. प्रेक्षकांना सिनेमा फार आवडला आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Filmfare (@filmfare)

  भुलभलैया 2 च्या कमाल यशानंतर पिंकवलाशी बोलताना निर्मात्यांनी पुढच्या सिनेमा विषयी विचारले असता त्यांनी म्हटले, 'कबीर सिंह या आयकॉनिक कॅरेक्टरवर आम्ही विचार करत आहोत आणि याचा सिक्वेल लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येईल'. त्याचप्रमाणे भुलभुलैया 3 ही येणार का असे विचारल्यानंतर त्यांनी म्हटले, 'हो आम्ही ही फ्रेंचायी नक्कीच पुढे घेऊन जाणार आहोत. याबाबतची माहिती तुम्हाला वेळोवेळी देत राहू'. मुलाखतीत निर्माते मुराद खेतानी यंनी आशिकीच्या सिक्वलवरही भाष्य केलं ते म्हणाले, 'आम्ही आशिकी 3 देखील नक्की घेऊन येऊ प्रेक्षकांनाही सिनेमा पाहायला आवडेल अशी अपेक्षा आहे'.  आशिकी 2 हासिनेमा 2013मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता ज्यात अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत होते. भूषण कुमार यांनी सिनेमांची निर्मिती केली होती. याचाच अर्थ येत्या काळात प्रेक्षकांना तब्बल 3 सिनेमांचे सिक्वेल पाहायला मिळणार आहेत.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Bollywood News, Entertainment

  पुढील बातम्या