VIDEO : सलमान-कतरिना चालत चालत जातायत तरी कुठे?

VIDEO : सलमान-कतरिना चालत चालत जातायत तरी कुठे?

आता आणखी एक नवा व्हिडिओ पुढे आलाय. अतुल अग्निहोत्रीनंच तो इन्स्ट्राग्रामवर टाकलाय. त्यात सलमान आणि कतरिना पाठमोरे चालताना दिसतायत.

  • Share this:

मुंबई, 20 नोव्हेंबर : सल्लूमियाँच्या फॅन्सचं सगळं लक्ष सध्या भारत सिनेमाच्या शूटिंगकडे आहे. भारतचं शूटिंग पंजाबच्या लुधियाना इथे सुरू आहे.

आता आणखी एक नवा व्हिडिओ पुढे आलाय. अतुल अग्निहोत्रीनंच तो इन्स्ट्राग्रामवर टाकलाय. त्यात सलमान आणि कतरिना पाठमोरे चालताना दिसतायत. कतरिनानं लाल साडी नेसलीय. हातात काळी छत्री घेतलीय.

सलमान तिच्या पुढे चालतोय. त्यानं निळा शर्ट, काळी पँट घातलीय. दोघांच्या बाजून सुरक्षा रक्षक चालतायत.

दोन दिवसांपूर्वी अतुलनं आणखी एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये सलमान चक्क खरेदीला बाहेर पडलाय. त्याच्या बरोबर त्याचे सुरक्षा रक्षक, पोलीस आहेतच. पण गर्दीचा गराडाही त्याच्याभोवती पडलाय. सलमानचा मेव्हणा अतुल अग्निहोत्रीनं हा व्हिडिओ ट्विट केलाय. त्याखाली कॅप्शनही लिहिलीय, ' भारतात भारत निघाला शाॅपिंगला'.

चित्रपटाच्या चौथ्या शेड्युलचं शूट सुरू असताना सलमानच्या लूकचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. आत्तापर्यंत या चित्रपटातील भूमिकांचे फोटोज व्हायरल होताना दिसत होते. मात्र आता सलमानचा शूटिंग दरम्यानचा फोटो व्हायरल झाला आहे. ज्यात सलमान चेक्स शर्टमध्ये आपल्या फॅन्ससोबत दिसला आहे. सलमानच्या हेअर स्टाईलकडे पाहिलं तर याआधी बजरंगी भाईजान या सिनेमात त्याची अशी हेअर स्टाईल दिसून आली होती. आणि आता भारत चित्रपटात तो अशाच लूकमध्ये दिसणार आहे.

भाईजान सलमान या चित्रपटात पाच वेगवेगळ्या वयोगटातील भूमिकांमध्ये दिसणार आहे. सिनेमात 20 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंतच्या भूमिकेत सलमान दिसेल. भारत हा चित्रपट कोरियन सिनेमा हिंदी रिमेक आहे. 'ऑड टू माय फादर' असं त्या चित्रपटाचं नाव आहे.

First published: November 20, 2018, 10:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading