S M L

बिग बींची सून आणि मुलीत का रे दुरावा?

गेल्या काही महिन्यांपासून या कुटुंबात सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसते. बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या आणि मुलगी श्वेता नंदा बच्चन यांच्या नात्याची घडी विस्कटल्याचे कळते.

Sonali Deshpande | Updated On: Jan 12, 2018 04:33 PM IST

बिग बींची सून आणि मुलीत का रे दुरावा?

12 जानेवारी : बाॅलिवूडची नणंद-वहिनी यांचं काही एकमेकांशी पटत नाहीय. खरं तर दोघीही बाॅलिवूडच्या शहेनशहाशी एकदम अॅटॅच आहेत. ओळखलंत ना? ऐश्वर्या राय बच्चन आणि बिग बी अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता नंदा बच्चनमधील मतभेद आता स्पष्टपणे दिसून येतायत. बी-टाऊनमधील प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित कुटुंबांमध्ये बच्चन कुटुंब हे आघाडीवर आहे. या कुटुंबाबद्दलची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांना रस असतो. गेल्या काही महिन्यांपासून या कुटुंबात सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसते. बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या आणि मुलगी श्वेता नंदा बच्चन यांच्या नात्याची घडी विस्कटल्याचे कळते.

नुकतीच फराह खानच्या बर्थडे पार्टीला श्वेताने हजेरी लावली होती. मात्र श्वेता जाणार असल्यामुळेच की काय ऐश्वर्याने या पार्टीला जाण्याचं टाळलं. एवढंच नाही तर विरुष्काच्या रिसेप्शनमध्येही फोटोग्राफर्सना पोज देताना या दोघींच्या चेहऱ्यावरचे बदललेले हावभाव कॅमेऱ्याने अलगद टिपले होते.

आराध्याच्या बर्थडे पार्टीलाही श्वेताने गैरहजर रहाणंच पसंत केलं. या साऱ्या प्रकारावरून श्वेता-ऐश्वर्याच्या नात्यात कटुता निर्माण झाल्याचं प्रकर्षाने जाणवतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 12, 2018 04:33 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close