News18 Lokmat

अनिकेत विश्वासराव- प्रियदर्शन जाधव करायला येतायत धमाल

हिंदी आणि मराठी अशा दोन्ही सिनेसृष्टीमध्ये अनेक अभिनेत्यांच्या जोड्या हिट ठरल्या आहेत. अनिकेत-प्रियदर्शन अशी नवीन जोडगोळी मराठी सिनेसृष्टीला मिळाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 29, 2018 06:07 PM IST

अनिकेत विश्वासराव- प्रियदर्शन जाधव करायला येतायत धमाल

मुंबई, 29 आॅक्टोबर : अभिनेता अनिकेत विश्वासराव पोश्टर बाॅईज, पोश्टर गर्ल, आंधळी कोशिंबीर अशा अनेक सिनेमातून भेटला. मुख्य करून अनिकेत विश्वासराव आपल्याला नेहमीच काॅमेडी करताना दिसतो. प्रियदर्शन जाधव टाईमपास सिनेमातून जास्त लोकांपर्यंत पोचला. हलालसारखा गंभीर सिनेमाही त्यानं केला.

अनिकेत विश्वासराव आणि प्रियदर्शन जाधव पुन्हा एकत्र रुपेरी झळकणार आहेत. या दोघांची जोडगोळी 'माझ्या बायकोचा प्रियकर' या सिनेमात धमाल करण्यास सज्ज झाली आहे. 'माझ्या बायकोचा प्रियकर' या सिनेमाच्या माध्यमातून हे दोघं पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही सिनेसृष्टीमध्ये अनेक अभिनेत्यांच्या जोड्या हिट ठरल्या आहेत. अनिकेत-प्रियदर्शन अशी नवीन जोडगोळी मराठी सिनेसृष्टीला मिळाली आहे.

या सिनेमाचे दिग्दर्शन राजीव एस. रुईया यांनी केले आहे. अनिकेत-प्रियदर्शनसोबतच या सिनेमात भाग्यश्री मोटे, प्रिया गमरे, अंशुमन विचारे, भारत गणेशपुरे, पदम सिंग, सुरेश पिल्लई, स्वाती पानसरे, अनुपम ताकमोघे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा २३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

मस्का सिनेमात अनिकेत विश्वासराव यांनी काम केलं होतं. तो सिनेमा प्रियदर्शननं दिग्दर्शित केला होता. त्यात प्रार्थना बेहरेही होती.

'मस्का' सिनेमानंतर अनिकेत आणि प्रार्थनाचा हा दुसरा सिनेमा आहे. आयुष्य हा एक प्रवास असून या प्रवासाचा आनंद घेता आला पाहिजे. असा संदेश या सिनेमातून देण्यात आला आहे.या प्रवासात येणाऱ्या अडथळ्यांना योग्य प्रकारे तोंड देऊन प्रवास सुखकर कसा करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे असंही या सिनेमात मांडण्यात आलं आहे.

Loading...

ऑक्टोबरपासून या सिनेमाचं चित्रीकरण सुरू होणार आहे. मैत्री, प्रेम आणि आयुष्यावर आधारलेल्या अनेक संकल्पनांना विविध पद्धतीने मांडणाऱ्या या सिनेमाची निर्मिती श्री तुळजाभवानी प्रसन्न फिल्म्स या बॅनरखाली करण्यात आली आहे.

'काॅफी विथ करण'मध्ये रणवीरनं उलगडलं त्याच्या फंकी पोशाखामागचं गुपित

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 29, 2018 06:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...