S M L

प्रियांका-निकचं 'फॅमिली प्लॅनिंग' सुरू!

निक या प्रेमाबद्दल किती सीरियस आहे, हे एका मुलाखतीत दिसून आलं होतं.

Updated On: Aug 10, 2018 04:15 PM IST

प्रियांका-निकचं 'फॅमिली प्लॅनिंग' सुरू!

मुंबई, 10 आॅगस्ट : प्रियांका चोप्रा आणि निक यांचं नातं आता दिवसेंदिवस घट्ट होत जातंय. कधी प्रियांका चोप्रा आपल्या बोटातली अंगठी लपवण्याचा प्रयत्न करते. तर कधी दोघं हातात हात घालून एकत्र दिसतात. कधी निक सोशल मीडियावर आपलं प्रेम व्यक्त करतो. त्यामुळे या लव्हबर्डची चर्चा अगदी परदेशातही सुरू आहे. पण हे प्रेम इतक्यावरच थांबणार नाही. निक या प्रेमाबद्दल किती सीरियस आहे, हे एका मुलाखतीत दिसून आलं होतं.

हेही वाचा

अनुष्का-वरुण आलेत 'सुई धागा' घेऊन


PHOTOS : राधिकाची इच्छा होणार पूर्ण, शनायाच्या येणार नाकीनऊ

आता सलमानसोबत भन्साळी आणि दीपिका बोलणार 'इन्शाअल्लाह'

काॅस्मोपाॅलिटीयन मालिकासाठी दिलेल्या मुलाखतीत निकनं म्हटलंय, माझं कुटुंब असणं हे माझं ध्येय आहे. आणि मी आशा करतो, हे लवकरच होईल. निक आपल्या भावाच्या लहान मुलीसोबत खेळत असतो. त्यानं तिचा फोटो इन्स्ट्रावर शेअर केला. आणि म्हटलंय ही छोटी परी मला खूप खूश ठेवते.

Loading...
Loading...

याचा अर्थ प्रियांकासोबत लग्न केल्यानंतर निकला बाळ हवंय. एक कुटुंब बनवायचंय. त्यामुळे आता लवकरच दोघांच्या लग्नाची तारीख लवकरच कळेल, असं वाटतंय.

प्रियांका आणि निकची ओळख क्वांटिको या सिरियलच्या सेटवरच झाली. निक हा तिथे प्रियांकाला पहिल्यांदा भेटला मात्र त्यांच्यात जेमतेम मैत्री निर्माण झाली. यानंतर त्यांच्या भेटीगाठी होत गेल्या आणि मैत्री हळूहळू वाढायला लागली. या रिलेशनशीपबाबत चर्चा तेंव्हा सुरू झाली जेंव्हा मेट गाला इव्हेंट 2017 ला प्रियांका निकच्या हातात हात घालून रेड कार्पेटवर अवतरली होती.

निक आणि प्रियांका यांच्यात 10 वर्षांचं अंतर आहे. निकला खरं तर प्रियांका मोठी असल्याने तिचा समजुतदारपणा जास्त आवडतो. तर प्रियांकालाही निकमध्ये तिला हवा तसा जोडीदार दिसलाय असं म्हणायला हरकत नाही. दुसरीकडे इन्टाग्राम अकाऊंटवरूनही प्रियांकाच्या फोटोंवर कमेंट्स करत निकने त्याच्या प्रेमाचा इजहार करून टाकला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 10, 2018 04:15 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close