प्रियांका-निकच्या लग्नाआधीचं पहिलं सेलिब्रेशन जोरदार

प्रियांका-निकच्या लग्नाआधीचं पहिलं सेलिब्रेशन जोरदार

बाॅलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या लग्नामुळे खूपच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी ती द स्काय इज पिंक सिनेमाचं शूटिंग करत होती. शूटिंगच्या सेटवर तिच्या लग्नाचं जोरदार सेलिब्रेशन झालं.

  • Share this:

मुंबई, 26 नोव्हेंबर : बाॅलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या लग्नामुळे खूपच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी ती द स्काय इज पिंक सिनेमाचं शूटिंग करत होती. शूटिंगच्या सेटवर तिच्या लग्नाचं जोरदार सेलिब्रेशन झालं.

या सेलिब्रेशनसाठी निकही उपस्थित होता. सिनेमाच्या टीमनं दोघांसाठी मोठा केक आणला होता. तो कापून सगळ्यांनी एकच धमाल केली.

View this post on Instagram

“The Sky Is pink” team celebrated the bride to be #priyankachopra with #nickjonas on their schedule wrapped party in Delhi ❤️🍾🎂 PCJ⚡️ Swipe left to see more . قام فريق عمل فيلم "السماء ورديه" بالاحتفال ب #بريانكا_تشوبرا بمناسبه زواجها بحضور نك جوناس في حفله اخر يوم تصوير في دلهي❤️🍾🎂 . و اخيررررراً خلصت تصوير و بترتاح جم يوم قبل العرس👏🏻 الكاست لطيييييييييففففف بس مايعرفون يصورون🙃 اول صوره وهم يوكلون بعض😍❤️❤️❤️❤️ . . #queenofbollywood#queenofhearts#queenpri#Bollywood#priyanka#بوليوود#NP#theskyispink

A post shared by ⚡️Nickyanka Ki Shaadi⚡️ (@priyanka.news) on

यावेळी सिद्धार्थ राय कपूरही उपस्थित होता. तसंच प्रियांकाचा भाऊही हजर होता. सगळेच जण खूप आनंदात होते. प्रियांका आणि निक आज ( 26 नोव्हेंबर ) जोधपूरला निघणार आहे.

जोधपूरचा किल्ला या लग्नासाठी सजवला जातोय.या लग्नात अगोदर कुणी फोटोग्राफर्सनी फोटोज काढू नयेत म्हणून एक चांगली शक्कल लढवलीय. लग्नात वधू-वर हेलिकाॅप्टरनं एन्ट्री करणार आहेत. त्यासाठी प्रियांका पहिल्यांदा मुंबईहून उदयपूरला जाणार. तिथून उम्मेद भवन पॅलेसमधून हेलिकाॅप्टरनं जोधपूरला लग्नाच्या ठिकाणी उतरणार.

29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरपर्यंत हेलिकाॅप्टर बुक केलं आहे. 2 डिसेंबरला हिंदू पद्धतीनं तर 3 डिसेंबरला ख्रिशन पद्धतीनं लग्न होणार आहे. लग्नाच्या तयारीसाठी मधू चोप्रा आधीच जोधपूरला गेल्यात.

First published: November 26, 2018, 9:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading