S M L

देसी गर्ल प्रियांकाची विदेशात चर्चा

नेहमीच हॉलिवूडच्या पुरस्कार सोहळ्यांना हजेरी लावणाऱ्या देसी गर्ल प्रियांका चोप्राने 'प्राइम टाइम एमी' पुरस्कार सोहळ्यातही धमाकेदार एण्ट्री घेतली.

Sonali Deshpande | Updated On: Sep 18, 2017 06:09 PM IST

देसी गर्ल प्रियांकाची विदेशात चर्चा

18 सप्टेंबर : नेहमीच हॉलिवूडच्या पुरस्कार सोहळ्यांना हजेरी लावणाऱ्या देसी गर्ल प्रियांका चोप्राने 'प्राइम टाइम एमी' पुरस्कार सोहळ्यातही धमाकेदार एण्ट्री घेतली. या  सोहळ्याला अनेक हॉलिवूड कलाकारही उपस्थित होते.मात्र यावेळी देसी गर्लच्या पांढऱ्या गाऊनने सगळ्यांचंच लक्ष वेधलं.

या पुरस्कार सोहळ्यादरम्यानचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच गाजतायत. पीसीच्या या पांढऱ्या गाऊनची सगळीकडेच चर्चा आहे. तिचा हा लूक चाहत्यांना भुरळ पाडणारा आहे एवढं नक्की.

प्रियांकाचा कुठलाही पोशाख हा नेहमी चर्चेत असतो. 'बेवाॅच'च्या वेळचे तिचे बिकनीतले फोटोही लोकप्रिय झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 18, 2017 06:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close