प्रियांका-निकच्या शाही लग्नातील 'या' गोष्टीवर आहे सासूबाईंची नाराजी

प्रियांका-निकच्या शाही लग्नातील 'या' गोष्टीवर आहे सासूबाईंची नाराजी

प्रियांका चोप्रा अणि निक जोनसच्या लग्नाला आता एक वर्ष होऊन गेलं. मात्र तरीही त्यांच्या लग्नाच्या चर्चा या वारंवार होत राहतात.

  • Share this:

मुंबई, 23 फेब्रुवारी : प्रियांका चोप्रा अणि निक जोनसच्या लग्नाला आता एक वर्ष होऊन गेलं. मात्र तरीही त्यांच्या लग्नाच्या चर्चा या वारंवार होत राहतात. या शाही लग्नाची चर्चा फक्त भारतातच नाही तर परदेशातही झाली होती. पण प्रियांकाचे सासू सासरे तिच्या ग्रँड वेडींगमधील एका गोष्टीमुळे नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत प्रियांकाचे सासरे पॉल केविन जोनस आणि सासू डेनिस यांनी निक-प्रियांकाच्या लग्नाचा अनुभव शेअर केला आणि त्यात प्रियांकाच्या सासूबाई या ग्रँड वेडींगबाबत तक्रार केली आहे.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस डिसेंबर मध्ये 2018 मध्ये उमेद भवन पॅलेसमध्ये विवाहबद्ध झाल्यावर मोठ्या प्रतिक्षेनंतर त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आणि या ग्रँड वेडींगचा थाट पाहून सर्वांचेच डोळे दिपले. मात्र प्रियांकाच्या सासूबाईंना काही हे फोटो आवडलेले नाहीत.

Indian Idol च्या सेटवर ढसाढसा रडला हिमेश रेशमिया, कारण वाचून व्हाल हैराण

प्रियांकाच्या सासू डेनिस जोनस यांच्या मते निक-प्रियांकाचं ग्रँड वेडींग जेवढं भव्य पद्धतीनं पार पडलं. त्याप्रमाणे ते फोटोग्राफरनी कॅप्चर केलं नाही. त्या सांगतात, यापेक्षाही अधिक भव्य पद्धतीनं हे फोटोशूट होऊ शकलं असतं मात्र तसं झालं नाही. प्रत्यक्षातला शाही अंदाज त्या फोटोमध्ये दिसायला हवा होता तसा दिसला नाही.

मोठी कमाई! स्मिता पाटील यांच्या बहिणीकडून मिळालेली भेट पाहून अमृता सुभाष भावुक

निक आणि प्रियांकानं हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन पद्धतीनं लग्न केलं या लग्नातील अनुभव काही दिवसांपूर्वी प्रियांकानं एका चॅट शो मध्ये शेअर केला होता. लग्नाच्या वेळी माझ्यापेक्षा निक जास्त रडत होता असं प्रियांकानं या शोमध्ये सांगितलं.

यावेळी प्रियांकाला लग्नात मिळालेल्या भेटवस्तूंविषयी सांगताना प्रियांका म्हणाली, मोठा दीर केविन जोनसनं आमच्या लग्नात 100 वाइन बॉटल गिफ्ट दिल्या होत्या तर दुसऱ्या दीर जो जोनसनं त्या बॉटल ठेवण्यासाठी कार सारखा दिसणारा फ्रिज गिफ्ट दिला होता.

आलिया भट्ट म्हणते-'आता मला चक्कर येईल', वाचा कारण

First published: February 23, 2020, 12:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading