Home /News /entertainment /

प्रियांका चोप्राच्या नवऱ्यावर महिलेचे आरोप; जोनस ब्रदर्स सोशल मीडियावर ट्रोल

प्रियांका चोप्राच्या नवऱ्यावर महिलेचे आरोप; जोनस ब्रदर्स सोशल मीडियावर ट्रोल

प्रियांका चोप्राचा (Priyanka Chopra) नवरा निक (Nick Jonas) आणि त्याच्या भावांवर एका महिलेनं आरोप केले आहेत. त्यामुळे जोनस ब्रदर्स सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत.

    मुंबई, 29 नोव्हेंबर: अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत स्वत:ची खास ओळख निर्माण केली आहे. ती लवकरच 'द व्हाइट टायगर' या बॉलिवूडपटामध्ये राजकुमार रावसोबत (Rajkumar Rao) झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. एकीकडे प्रियांकाचं करिअर सुस्साट सुरू असताना, प्रियांका चोप्राच्या पतीचं नाव मात्र वादात अडकलं आहे. तो आणि त्याचे भाऊ सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहेत. महिलेचं ट्वीट व्हायरल एका महिलेनं निक जोनस आणि त्याच्या भावांवर आरोप केला आहे की, ‘थँक्सगिव्हिंगच्या परेडदरम्यान निक जोनस आणि त्याच्या भावांनी माझी खिल्ली उडवली. त्यांचं वागणं अतिशय चुकीचं होतं.’ तिचं ट्वीट सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. टेलर गॅरॉन असं या महिलेचं नाव आहे. तिच्या ट्वीटमुळे निक जोनस आणि त्याचे भाऊ सध्या सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहेत. यावर जोनस कुटुंबातल्या कोणाचीही प्रतिक्रिया आलेली नाही. प्रियांका काय प्रतिक्रिया देणार याकडे तिचे चाहते आणि ट्रोलर्स लक्ष ठेऊन आहेत. बॉलिवूडमधून करिअरला सुरुवात करणाऱ्या प्रियांकाचे जगभरात अनेक चाहते आहेत. ती सध्या अमेरिकेत नवऱ्यासोबत राहात आहे. प्रियांका आणि निकच्या वयातील अंतरामुळे त्यांच्या लग्नाला फारच विरोध झाला होता. प्रियांकाच्या हातात सध्या 2 हॉलिवूड चित्रपट आहेत. तसंच बऱ्याच दिवसांनी ती द व्हाइट टायगर या बॉलिवूडपटामध्येही झळकणार आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Nick jonas

    पुढील बातम्या