तुमच्या पार्टीच्या खर्चापेक्षाही जास्त आहे प्रियांकाच्या बर्थडे केकची किंंमत!

तुमच्या पार्टीच्या खर्चापेक्षाही जास्त आहे प्रियांकाच्या बर्थडे केकची किंंमत!

प्रियांकाच्या वाढदिवसाचा केक सुद्धा तेवढाच खास होता. गोल्डन आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन असलेला 5 लेअरच्या या केकची किंमत ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटल्या शिवाय राहणार नाही.

  • Share this:

मुंबई, 29 जुलै : प्रियांका चोप्राचा 37 वा वाढदिवस नुकताच झाला. अमेरिकेत नवरा निक जोनास आणि जवळच्या नातेवाईकांबरोबर तिने झोकात वाढदिवस साजरा केला. ही देसी गर्ल आता फक्त आपल्या देशातच नाही, तर जगभरात स्टाईल आयकॉन मानली जाऊ लागली आहे. वाढदिवसाच्या दिवशीचे तिचे कपडे आणि स्टाईल पाहिली तर याची खात्री पटेल. पण यासोबतच प्रियांकाच्या वाढदिवसाचा केक सुद्धा तेवढाच खास होता. गोल्डन आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन असलेला 5 लेअरच्या या केकची किंमत ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटल्या शिवाय राहणार नाही.

पिंकव्हीलानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, प्रियांकाच्या वाढदिवसासाठील तयार करण्यात आलेला हा मियामी बेस डिलिशियस केक सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला होता. चॉकलेट आणि व्हनिला पासून तयार केलेला हा 5 लेअरचा केक जवळपास 5,000 युएस डॉलर म्हणजे भारतीय 3,45,000 एवढ्या किंमतीचा होता. निक जोनसनं अगदी शेवटच्या क्षणाला या केकची ऑर्डर दिली होती. हा केक तयार करण्यासाठी 24 तासांचा कालावधी लागला. असं केक मेकर्सनी सांगितलं. याशिवाय प्रियांकानं तिच्या वाढदिवसाला घातलेला ड्रेस आणि बॅग सुद्धा त्याच्या किंमतीमुळे चर्चेत राहीली.

शाहरुखची लेक सुहानानं शेअर केला आणखी एक HOT फोटो, खान कुटुंबाचा मालदीव स्वॅग

प्रियांकाच्या चोप्राच्या या बर्थ डे स्पेशल लाल ड्रेसची किंमत ऐकाल तर नवल वाटेल. 16Arlington या ब्रँडचा हा ड्रेस 1145 अमेरिकन डॉलर्सचा होता. भारतीय रुपयांमध्ये याची किंमत होईल तब्बल 80,000 रुपये. लाल मिनी ड्रेस, लिपस्टिक क्लच याच्या साथीला प्रियांकाने गोल्डन स्ट्रॅपच्या हिल्स घातल्या होत्या. किटन हिल्स प्रकारच्या या हिल्स ड्रेसला अगदी सूट होणाऱ्या होत्या.

KGF 2 : अधीराचा फर्स्ट लुक आउट, वाढदिवसाला संजय दत्तकडून चाहत्यांना गिफ्ट

 

View this post on Instagram

 

In Miami with the birthday gurllll! Happy bday Mimi didi. There’s never gonna be another like you. Actress or sister @priyankachopra

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

हा चमचमता लाल ड्रेस आणि एक स्टायलिश पर्स घेऊन प्रियांका आपला नवरा निक जोनस आणि त्याचा भाऊ यांनी 2008 मध्ये गायलेल्या एका गाण्यावर थिरकताना दिसली होती. तर तिने हातात घेतलेल्या क्लचची किंमत जवळपास 3 लाख रुपये होती. लिपस्टिक क्लच 5,495 अमेरिकन डॉलर एवढ्या किमतीचा आहे, असं समजतं.

कपूर साहेब, तुम्ही वेड्यांच्या डॉक्टरांना भेटा; जावेद अख्तर संतापले

आपल्या गाण्यावर थिरकताना दिलखुलास हसणाऱ्या आपल्या बायकोचा व्हिडिओ निकनेच शेअर केला होता. क्वांटिको या मालिकेनंतर प्रियांका चोप्रा अमेरिकेसह पाश्चिमात्य देशातलीही सेलेब्रिटी झाली आहे. काही अमेरिकन प्रोजेक्ट्सबरोबरच प्रियांकाने स्काय इज पिंक या शोनाली बोस दिग्दर्शित सिनेमाचं शूट नुकतंच संपवलं आहे. या आगामी चित्रपटात तिच्याबरोबर फरहान अख्तर आणि झायरा वसीम असतील.

===========================================================================

'...यावर एकच उपाय नाटकात काम न करणं', का भडकला सुबोध भावे? पाहा VIDEO

Published by: Megha Jethe
First published: July 29, 2019, 6:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading