मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Priyanka Chopra: प्रियांका चोप्राची लेक मालतीसोबत फर्स्ट ट्रीप; 'या'देशात घेतेय सुट्टीचा आनंद

Priyanka Chopra: प्रियांका चोप्राची लेक मालतीसोबत फर्स्ट ट्रीप; 'या'देशात घेतेय सुट्टीचा आनंद

सध्या प्रियांका आपल्या लेकीसोबत आपल्या पहिल्या ट्रीपचा मनसोक्त आनंद घेत आहे. अभिनेत्रीने शेअर केलेले फोटो सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत.

सध्या प्रियांका आपल्या लेकीसोबत आपल्या पहिल्या ट्रीपचा मनसोक्त आनंद घेत आहे. अभिनेत्रीने शेअर केलेले फोटो सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत.

सध्या प्रियांका आपल्या लेकीसोबत आपल्या पहिल्या ट्रीपचा मनसोक्त आनंद घेत आहे. अभिनेत्रीने शेअर केलेले फोटो सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 21 सप्टेंबर-  बॉलिवूड-हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सतत आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीने काही महिन्यांपूर्वी सरोगसीद्वारे एका गोंडस लेकीला जन्म दिला आहे. अभिनेत्री सतत आपल्या लेकीसोबत खास वेळ घालवत असते. प्रियांका चोप्रा सध्या आपली मुलगी मालती मेरी चोप्रा जोनाससोबत न्यूयॉर्कमध्ये आहे. प्रियांकाने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मुलीसोबतचे दोन सुंदर फोटो शेअर केले आहेत. प्रियांकाची लेक मालतीसोबत ही पहिलीच ट्रीप होती. या फोटोंमध्ये मालती प्रियांकाच्या मांडीवर खिडकीजवळ बसलेली दिसत आहे.सध्या हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस काही महिन्यांपूर्वी सरोगेसीद्वारे आईबाबा बनले आहेत. त्यांची लेक जन्मताच प्रचंड अशक्त होती. त्यामुळे तिला जन्मानंतर तब्बल एक महिना हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे ती फारच अशक्त दिसून येत होती. सध्या ती एकदम उत्तम आहे. प्रियांका आणि निकने आपल्या या लेकीचं नाव मालती मेरी असं ठेवलं आहे. सध्या प्रियांका आपल्या लेकीसोबत आपल्या पहिल्या ट्रीपचा मनसोक्त आनंद घेत आहे. अभिनेत्रीने शेअर केलेले फोटो सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत.

अभिनेत्रीने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये ती आपल्या लेकीला मांडीवर घेऊन खिडकीतून बाहेर पाहात आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये प्रियांका चोप्रा कॅमेऱ्यासाठी पोज देत आहे तर तिची मुलगी मालती न्यूयॉर्कच्या इमारती आणि रस्ते कुतूहलाने पाहात आहे. या फोटोंमध्येही प्रियांकाने मुलीचा चेहरा दाखवलेला नाही. हा फोटो शेअर करताना प्रियांकाने सांगितलंय की 'हा तिच्या लेकीचा पहिला प्रवास आहे. अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहलंय, माझ्या डोळ्यातील ताऱ्याचा पहिला प्रवास'.यावरुनच स्पष्ट होतं की मालतीने पहिल्यांदाच प्रवास केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

(हे वाचा:Kareena Kapoor B'day: नवाब घराण्याची सून असूनही करीनाने स्वतः कमावलीय इतकी संपत्ती; आकडा वाचून बसेल धक्का )

प्रियांका चोप्राच्या या व्हायरल फोटोंवर प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स पाहायला मिळत आहेत. फक्त चाहतेच नव्हे तर सेलिब्रेटीसुद्धा यावर कमेंट्स देत आहेत. अभिनेत्री अनुष्का शर्मा, सोनाली बेंद्रे, दिया मिर्झा,डिझायनर अनिता श्रॉफ अजदानिया सोबतच अभिनेता रणवीर सिहंनेसुद्धा कमेंट्सच्या माध्यमातून प्रियांका आणि तिच्यावर गोंडस लेकीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood News, Entertainment, Hollywood, Priyanka chopra